DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक

छपरा : बिहारमध्ये सारण रेंजचे डीआयजी मनु महाराज ( dig manu maharaj) यांना सायबर क्राइमचा फटका बसला आहे. छपराच्या एका तरूणाने त्यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर लोकांना फसवल्याचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. मात्र, वेळीच पोलिसांनी मनु कुमार नावाच्या या आरोपीला अटक केली. गडखा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहाडपुर गावात राहणारा मनु कुमार सोशल मीडियावर डीआईजी मनु महाराज ( dig manu maharaj) यांच्या नावाचा वापर करून लोकांना प्रभावित करण्याचे कृत्य करत होता.

आरोप आहे की, मनु कुमारने फेसबुकवर बनावट प्रोफाइल बनवले आणि स्वता मनु महाराज असल्याचे भासवत अनेक तरूणींशी मैत्री केली आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवू लागला. फेसबुकवर मनु महाराज यांचे प्रोफाइल पाहून वेगाने त्याचे फॉलोअर वाढू लागले. आरोपी या पॉपुलॅरिटीचा फायदा घेत अनेक मुलींना नोकरी देण्याचे आश्वासन देऊ लागला. त्यापैकी अनेकींकडून त्याने पैशांची सुद्धा मागणी केली. परंतु काही मुलींना यावर संशय आला तेव्हा त्यांनी ही माहिती डीआयजी मनु महाराज यांना दिली. ज्यानंतर डीआयजीच्या आदेशावर आयटी सेलने त्याचा शोध घेतला आणि गडखा येथून आरोपी मनु कुमारला अटक केली. चौकशीत आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला.

डीआयजी मनु महाराज यांच्या नावाशी मिळते-जुळते नाव असल्याने आरोपी तरूणाने फेक फेसबुक प्रोफाइल बनवले आणि मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी चॅटिंग करू लागला. डीआईजी मनु महाराज यांनी काही सांगितले की, काही मुलींनी माझ्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत माहिती दिली. हे ऐकून मनु महाराज यांनाही आश्चर्य वाटले.

 

Also Read This : 

 

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

 

राज्यातील ‘या’ मोठ्या प्रकल्पाला मान्यता ! नाशिक-पुणे-अहमदनगर शहराच्या विकासाला ‘सुपरफास्ट’ चालना

 

 

Coronavirus : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय? जाणून घ्या कधी येते हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ

 

घटस्फोटीत महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, रोज घेत होती 4 तास ‘क्लास’

 

डोक्यातील कोंडा, गळणाऱ्या केसांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या