‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी लोकांना सांगत आलोय की, तुम्हाला फक्त राजकारणच करायचे असेल, तर हा विकास हवाच कशाला, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या विकास कामांचा हवाला दिला आहे. विरोधात असले तरी ज्या गोष्टी चांगल्या आहेत. त्या चांगल्या म्हणाव्याच लागतात. पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठ काम केले आहे, पण काय झाल नशिबी पराभवच आल ना, असे म्हणत लोकांच्या विकासाच्या राजकारणाबद्दलच्या उदासिनतेवर ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray एका वेबिनारच्या कार्यक्रमात बोलत होते. विकासाचे प्रश्न आणि राजकारणाचा संबंध नाही, असे वाटत का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, मला पण हाच प्रश्न पडला आहे. नाशिक शहरासंदर्भात मी एक स्वप्न बघितल. नाशिकमध्ये फक्त डागडुजी केली नाही. तर कायमस्वरूपी काम केली. पाण्याचा प्रश्न सोडवला. नाशिक खड्डेमुक्त केले. त्याकाळी झालेल्या गोष्टी लोकांनाही अपेक्षित नव्हत्या. अनेक उद्योगपतींना नाशिकमध्ये बोलावल. त्या शहरात विकासकामे केली. त्या पाच वर्षात नाशिक महापालिका ही एकमेव महापालिका होती की, त्या काळात विरोधकांना एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. पण ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यात विकासाचा संबंधच नव्हता. म्हणून मी लोकांना सांगत आलोय की, तुम्हाला फक्त राजकारणच करायचं असेल, तर हा विकास हवा कशाला. समाज सुशिक्षित असून, चालत नाही, तो सुज्ञही असावा लागतो, तर त्याला अर्थ असल्याचे ते म्हणाले. नाशिकच्या शेवटच्या भाषणात मी म्हणालो होतो की, इतर पक्षांप्रमाणेच राज ठाकरे वागणार कामाची अपेक्षा धरायची आणि निवडणुकीत वेगळ्याचं मुद्द्यांवर मतदान करायचे अस करून चालणार नाही. मग माणस असा विचार करायला लागतात की यांना विकास नकोय, असे म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती