खुशखबर ! बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिक्षण विभागाच्या वतीने प्रलंबित असणाऱ्या भरतीच्या जाहिरातीला आज मुहूर्त लागला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि विनोद तावडे यांच्या उपस्थित पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक यांची भरती केली जाणार आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने १०,००१ पदांची भरती संपूर्ण महाराष्ट्रात केली जाणार आहे.त्या पैकी अनुसूचित जाती १७०४, अनुसूचित जमाती २१४७,अनुसूचित जमाती (पेसा) ५२५, व्हि.जे.ए ४०७, एन.टि.बी २४०, एन.टी.सी २४०, एन.टी.डी. १९९, ओबीसी १७१२, इ.डब्ल्यू.एस ५४०, एस.बी.सी.२०९, एस.ई.बी.सी.११५४ सर्व साधारण ९२४ अशी शिक्षक पदे आरक्षण निहाय आहेत.

साधारता पाच हजारांच्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्याने रिक्त जागा कमी झाल्या आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काढलेली हि पहिलीच भरती होत आहे. शिक्षक पदासाठी ऑनलाईन आवेदन भरताना शांततेत अर्ज भरावा आणि चुका टाळाव्यात असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांनी या भरती संदर्भात संपूर्ण कार्यवाही केली आहे. सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना जाहिरात पाहण्यास मिळत आहे. तर इच्छुक उमेदवारांना २ मार्च २०१९ शिक्षक भरतीची जाहिरात पाहण्यास मिळणार आहे.

Loading...
You might also like