भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा बनला ‘बाबा’ ! 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा उपकर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोडंस मुलीला जन्म दिला आहे. रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते.
रितिका सजदेवची चुलत बहिण आणि सोहेल खानची पत्नी सिमा खानने इन्स्टाग्रामवर मावशी झाल्याची पोस्ट टाकली आहे. सिमाने रितिकाला टॅग करत ही पोस्ट टाकली आहे. या आनंदी वार्तामुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, आपल्या लाडक्या लेकीला पाहण्यासाठी तो लवकरच भारत दौरा करू शकतो.

रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत गेल्या आठवड्यात झालेल्या एका मुलाखतीत  याबाबत माहिती दिली होती. लवकरच, मी बाप होणार असल्याचं रोहितनं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता.