खुशखबर ! अखेर मान्सून अंदमानात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या कोरोनाचं संकट आहेच पण शेतकऱ्याला आता पाऊसाची चाहूल लागली आहे. यामुळे एक आनंदाची बातमी समोर आलीय. काही दिवसापूर्वी हवामान खात्याने २१ मे ला यंदाचा मान्सून अंदमानात येणार असल्याचा अंदाज केला होता. यावरूनच आता याच वेळेमध्ये पाऊस अंदमानात दाखल झालाय. तसेच, १ जुन या दिवशी पाऊस केरळमध्ये दाखल होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आल आहे.

मान्सून वारे आज (२१ मे) अंदमान बेटांवर पोहोचले आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार झाले आहे. या पाऊसाचा अलगत परिणाम निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदामानाच्या काही भागात दिसून येत आहे. आगामी ४८ तासात हा परिणाम दिसून येणार असल्याच सांगण्यात आलं आहे. तसेच, सध्या पाऊसच वातावरण पोषक आहे. १ जूनला केरळ आणि १० जूनपर्यंत तळकोकणात पावसाचं आगमन होणार आहे. तसेच १५ ते २० जून या कालावधीत महाराष्ट्रात देखील रिमझिम येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.