SSB : सशस्त्र सुरक्षा बलात कॉनस्टेबलची भरती, 1541 पदांसाठी नोटिफिकेशन जारी, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया जसजशी वाढत आहे, तसतसे लॉकडाऊनमुळे रोखण्यात आलेल्या विविध सरकारी विभागातील आणि संस्थांमधील नोकऱ्यांच्या जाहिराती आता प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सिरीजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत सशस्त्र सीमा बलात (SSB) पे-मॅट्रिक्स लेव्हल-2 मधील कॉन्स्टेबल रँकवर असलेल्या विविध ट्रेडसच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एसएसबीद्वारे जारी केलेल्या रिक्त पदांच्या परिपत्रकानुसार चालक, कारपेंटर, प्लंबर, वॉशरमन, न्हावी आणि इतर ट्रेड्समध्ये जाहिरात केलेले कॉन्स्टेबल ट्रेडमेनच्या पदांसाठी भरती (अस्थायी) करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या योग्य व इच्छुक उमेदवार SSB च्या अधिकृत भरती पोर्टल ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोजगाराच्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करु शकतात.

ट्रेडनुसार रिक्त पदांची संख्या
1. कॉन्स्टेबल (चालक, केवळ पुरुष उमेदवार) – 547 पदे
2. कॉन्स्टेबल (प्रयोगशाळा सहाय्यक ) – 21 पदे
3. कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – 111 पदे
4. कॉन्स्टेबल (आया) – 5 पदे
5. कॉन्स्टेबल (सुतार) – 03 पदे
6. कॉन्स्टेबल (प्लंबर) – 1 पद
7. कॉन्स्टेबल (पेंटर) – 12 पदे
8. कॉन्स्टेबल (टेलर) -20 पदे
9. कॉन्स्टेबल (मोची-कॉब्लर) – 20 पदे
10. कॉन्स्टेबल (गार्डनर) – 9 पदे
11. कॉन्स्टेबल (कुक-परुष) – 232 पदे
12. कॉन्स्टेबल (कुक-महिला) – 26 पदे
13. कॉन्स्टेबल (वॉशरमन-पुरुष) – 92 पदे
14. कॉन्स्टेबल (वॉशरमन-महिला) – 28 पदे
15. कॉन्स्टेबल (न्हावी – पुरुष) – 75 पदे
16. कॉन्स्टेबल (न्हावी-महिला)- 12 पदे
17. कॉन्स्टेबल (सफाईवाला – पुरुष) – 101 पदे
18. कॉन्स्टेबल (सफाईवाला- महिला) -12 पदे
19. कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर- महिला) – 12 पदे
20. कॉन्स्टेबल (वेटर- पुरुष) – 1 पद