Google For India : आता विना ‘इंटरनेट’ आणि ‘फ्री’मध्ये वापरू शकता ‘गूगल असिस्टेंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google Assistant आता 30 भाषांमध्ये 80 देशात वापरले जाते. भारतात मागील दोन वर्षापूर्वी गुगल असिस्टंट लॉन्च करण्यात आले. आता भारतात फोन लाइन गुगल असिस्टंट लॉन्च करण्यात आला आहे. गुगलने वोडाफोनबरोबर मिळून फोन लाइन असिस्टंट लॉन्च केले. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. यासाठी इंटरनेट देखील लागणार नाही. यासाठी एक नंबर देखील देण्यात आला आहे त्यावर कॉल करुन तुम्ही माहिती मिळवू शकतात.

हा आहे Google Assistant फोन लाइन नंबर – 0008009191000
ज्या पद्धतीने इंटरनेटवर तुम्ही प्रश्न विचारु शकतात त्याचप्रमाणे या नंबरवर कॉल करुन तुम्ही प्रश्न विचारु शकतात. यावरुन तुम्हाला रेल्वेच्या वेळेपासून रेस्टॉरेंटसंबंधित सर्व माहिती मिळेल.

यासाठी गुगलने वोडाफोन आणि आयडिया बरोबर पार्टनरशिप केली आहे. यावरुन तुम्ही बातम्या आणि फोरकास्टसंबंधित माहिती मिळवू शकाल. हे हिंदी आणि इंग्रजीसाठी असेल. फक्त वोडाफोन आयडिया यूजर्स या सुविधेचा वापर करु शकतात.

गुगलने गुगल सर्च संबंधित नव्या घोषणा केल्या आहेत. कंपनीने गुगल लेस मध्ये काही फिचर्स अ‍ॅड केले आहेत. आता यूजर्स एखाद्या बोर्डवर लिहिलेले कन्टेेंटपाहून रिअल टाइम ट्रान्सलेट करु शकाल. शिवाय ट्रान्सलेशनला लाइव ऐकले जाऊ शकते. हे फिचर तीन भाषांमध्ये उपलब्ध होईल.

google-assistant-phone-line_091919023437.jpg