ताज्या बातम्या

Google नं लॉन्च केले ‘हे’ 6 अ‍ॅप्स, तुम्हाला सोशल मिडीया आणि मोबाईलपासून दूर ठेवतील, जणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी वेब सर्च कंपनी गुगलने आपल्या ग्राहकांसाठी 6 नवीन अ‍ॅप लाँच केले आहेत. यामुळे आता सारखे सारखे मॅसेज आणि नोटिफिकेशन चेक करण्याची गरज पडणार नाही. यासाठी गुगलने अनलॉक क्लाक, पोस्ट बॉक्स, पेपर फोन, डेजर्ट आयलँड, वी फ्लिप आणि मॉर्फ एप बाजारात आणले असून ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

अन्य कंपन्या देखील सुविधा आणणार
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या या सहा ऍपनंतर अन्य कंपन्या देखील आपल्या ग्राहकांसाठी अशाप्रकारच्या सुविधा बाजारात आणणार असून 2018 मध्ये पिक्सेल मोबाईलमध्ये हे ऍप्स दिले होते. मात्र आता हे ऍप्स अँड्रॉइडमध्ये देखील सपोर्ट करणार आहेत.

हे आहेत सहा अ‍ॅप

1)Unlock Clock
हे फिचर मोबाईलमध्ये लाईव्ह वॉलपेपर सारखे काम करणार असून याद्वारे दिवसातून किती वेळा फोन अनलॉक केला हे याची माहिती मिळणार आहे. हे ऍप इनस्टॉल केल्यानंतर तुम्हाला दिसणार नसून वॉलपेपरच्या रूपात लायब्ररीमध्ये राहणार आहे.

2)Post Box App
हे ऍप पोस्ट बॉक्स प्रमाणे काम करणार असून तुम्ही ठरवलेल्या वेळेतच तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता. याद्वारे तुम्ही तुमची महत्वाची कामे लक्षात ठेवून वेळेत करू शकता.

3)V Flip App
टेक्निकल जगाच्या ऐवजी हे ऍप तुम्हाला फिजिकल जगात राहायला शिकवते.

4)Paper Phone App
या ऍपद्वारे तुम्ही तुमचे डिजिटल बुकलेट बनवू शकता. यामुळे कागदाची बचत होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही तुमची महत्वाची माहिती नोंदवून ती लक्षात ठेवू शकता.

5)Desert Island A
या ऍपद्वारे टेक्नॉलॉजीचा कमी वापर व्हावा याकडे लक्ष आहे. हे ऍप तुम्हाला कमीतकमी ऍप वापरण्यासाठी प्रवूत्त करते. तसेच तुमच्या दिवसभरातील कामांकडे देखील हे लक्ष ठेवून असते.

6)Morph App
या ऍपद्वारे तुम्ही तुमचे लोकेशन आणि वेळ फिक्स करून महत्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकता. अँड्राईड लाँन्चर प्रमाणे हे काम करणार आहे.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा

Back to top button