तब्बल 22 वर्षापासून गायब असलेल्याला ‘यानं’ गुगल मॅपच्या मदतीनं शोधलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या एका व्यक्तीने गुगल ऍप्सच्या माध्यमातून २२ वर्षांपासून हरवलेल्या एका व्यक्तीचा तपास लावला आहे. गुगलच्या माध्यमातून सर्च करताना जवळच्या तलावात एक हाडांचा सापळा असल्याचे समजताच त्या व्यक्तीने पोलिसांना खबर केली.

अमेरिकेच्या फ्लोरिडामधील एक व्यक्ती गुगल द्वारे आपला परिसर पाहत होता तर त्याला जवळच्या एका तलावात एक कार बुडालेली दिसली. त्यानंतर त्या व्यक्तीने काही प्रशासन अधिकाऱ्यांना बोलाऊन त्या तलावाची तपासणी करायला लावली तेव्हा त्या कारच्या आतून एक हाडांचा सापळा मिळाला आहे. २२ वर्षांपासून लापता असलेल्या एका व्यक्तीचा तो सापळा असल्याचे समोर आले आहे.

विलियम मोल्ड्ट असं तलावात बुडालेल्या व्यक्तीचे नाव असून तो १९९७ पासून लापता होता. विलियम कार एका तलावात अडकली होती आणि तोही त्याच कारमध्ये होता.

ज्या व्यक्तीने हा शोध लावला त्याने पहिल्यांदा तलावातील कार पाहिल्यावर आपल्या घर मालकाला फोन करून विचारले आणि कार बद्दल माहिती दिली त्यावर घरमालकाने त्याला असे काही माहित नसल्याचे सांगितले त्यावर त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले.

You might also like