महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ‘प्रवक्ते’पदी जेष्ठ काॅंग्रेस कार्यकर्ते, अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीचे माजी सदस्य व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तिवारी यांच्या नियुक्तीचे पत्र टिळक भवन, मुंबई येथे दिले.
Gopal Tiwari

गोपाळ तिवारी हे अभ्यासू, कार्यक्षम व निष्ठावान कार्यकर्ते असून, ते गेल्या काही महीन्यांपासून माध्यमांमध्ये पक्षाची बाजू समर्थपणे मांडत असुन, चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्या कार्याला अधिक वाव मिळावा, तसेच पक्षाची बाज़ू अधिक सक्षमतेने मांडता यावी, या हेतूने त्यांना ‘प्रदेश काॅंग्रेस प्रवक्ते’पदी नियुक्ती केल्याचे प्रदेश कार्यालयातील सूत्रांनी म्हटले आहे.

प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल गोपाळ तिवारी यांनी आनंद व्यक्त केला असून, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू व पक्षाच्या आणि नेत्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांना खरे ऊतरण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी