
Gopichand Padalkar | ‘वेळ पडलीच तर बापू बिरू व्हायची…’, गोपीचंद पडळकरांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चौंडी येथे धनगर समाजातील कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचा चौदावा दिवस असून अद्याप सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने आता धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी राज्यात 25 ठिकाणी तसेच खंबाटकी घाटात रस्ता रोको केला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. आता त्यांनी केलेल्या एका ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर! नाद करु नका! यळकोट यळकोट, जय मल्हार! तसेच या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये पडळकरांनी राजमाता अहिल्याबाई होळकरांचा झेंडा फडकवताना दिसत आहेत, त्या व्हिडिओत म्हटलंय की, जिथे गरज पडेल तिथे बाळूमामा झालं पाहिजे आणि वेळ पडलीच तर बापू बिरू व्हायची सुद्धा तयारी असली पाहिजे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पडळकर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पडळकरांचा इशारा
दरम्यान, पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणाले, आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा, पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातसुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन उभा होईल. हे मी आपणास अत्यंत जबाबदारीने सांगतोय, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)