Gopichand Padalkar On Sharad Pawar | गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पुन्हा शरद पवारांना डिवचले, म्हणाले…

सोलापूर : Gopichand Padalkar On Sharad Pawar | भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या स्तराची टीका करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डिवचले आहे. यापूर्वी पडळकर यांनी शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अशाच प्रकारची टीका केली होती. (Gopichand Padalkar On Sharad Pawar)

आता पुन्हा एकदा पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांचा उल्लेख जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा, असा केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (Gopichand Padalkar On Sharad Pawar)

माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे धनगर जागर यात्रेच्या सभेत ते बोलत होते. पडळकर म्हणाले, राज्यात जातीजातीत कोण भांडणे लावते? रिपाईचे तुकडे कोणी केले? बी. के. कोकणे यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण पाहिजे असताना एनटीमध्ये कोणी दिले? महाराष्ट्रात तो लांडगा असून त्याचे नाव राज्यातील सर्व लोकांना माहित आहे.

पडळकर म्हणाले, आमचे आदिवासी समाजासोबत भांडण नाही. विरोधात बोलत असलेले १० टक्के आदिवासी हे ९० टक्के आदिवासी समाजाचे लाभ उठवत आहेत. राज्यात १ कोटी ५ लाख आदिवासी समाज असला तरी पाच लाख लोकांकडे सुद्धा एसटीचे दाखले नाहीत. आदिवासींच्या एकूण ४७ जमातींपैकी ४५ जमाती राज्यात अस्तित्वात आहेत.

यातील ३३ जमाती या अन्यायग्रस्त आहेत. धनगर समाजाला एसटीमध्ये घेण्यास विरोध करणारे हेच १० टक्के आदिवासी आहेत. त्यांनी आजवर ९० टक्क्यांच्या आमदारकी, खासदारकी, मंत्री पदे, शिक्षण, नोकऱ्या आणि राज्य व केंद्राचा कोट्यवधींचा निधी खाल्ला आहे. यासंदर्भात अधिवेशनात बोलणारा मी पहिला आमदार होतो

पडळकर पुढे म्हणाले, या विषयावर मी अधिवेशनात भूमिका मांडणार आहे. धनगर जागर यात्रेनंतर आदिवासींमधील अन्यायग्रस्त महादेव कोळी अशा ३३ जमातींसाठी संपर्क अभियानास सुरुवात करणार आहे.

धनगर आरक्षणावर पडळकर म्हणाले, धनगर आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचे नाही. माझ्यावर यापूर्वी दोनवेळा प्राणघातक हल्ले झाले. धनगर समाज मोठा असल्याने जर जागा झाला तर स्पर्धेमध्ये येऊ शकतो हे प्रस्थापितांना माहित आहे. हे थांबवायचे असेल तर गोपीचंदला थांबवावे लागेल. त्यामुळे काही होऊ शकते. काही जरी झाले तरी धनगर आरक्षणाची चळवळ थांबता कामा नये. एसटी आरक्षणाचा दाखला मिळेपर्यंत कोणी शांत झोपू नये.

गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन
मंचाच्या केसला ८, ११ आणि १५ डिसेंबर अशा सलग तारखा मिळाल्या आहेत. मधू शिंदे यांनी १७० पुरावे सादर केलेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शासनानेही मदत केली. सर्व कागदपत्रे सादर केल्याने हक्काचे आरक्षण लवकरच मिळेल.

आमची आदिवासी बांधवांशी कोणतीही लढाई नसून ज्या धनगड सोबत लढाई होती ती आता २०१९ मध्ये
संपल्याने आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. गरज पडल्यास धनगर समाजाला एसटी मधील हक्काचे
आरक्षण मिळण्यासाठी समाजाने रस्त्यावरील लढ्यास तयार राहावे. आजवर धनगर समाजाचा सर्वांनी फक्त वापर
केल्याने आता भाजपकडून अशा आहे.

मराठा आरक्षणावर बोलताना पडळकर म्हणाले, गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
त्यांची मागणी रास्त असून आमचा त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. फडणवीस यांनी त्यांना आरक्षण दिले होते.
त्याच पद्धतीने पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | आमदार रविंद्र धंगेकर म्हणतात, सीआयडी कडे तपास द्या; देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘त्याला पण…’ (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | दसरा-दिवाळीत शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का? शिंदे गटातील मंत्र्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, ‘तो’ नेता कोण?