Maharashtra Politics News | दसरा-दिवाळीत शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का? शिंदे गटातील मंत्र्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, ‘तो’ नेता कोण?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सोबत घेऊन भाजपाने राज्यात सत्ता हस्तगत केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाला सत्तेत सहभागी करून भाजपाने (BJP) आपली राजकीय ताकद वाढवली आहे. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दसरा-दिवाळीत धमका होणार असल्याचे सूतोवाच मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केले आहे. (Maharashtra Politics News)

शंभुराज देसाई म्हणाले, दसरा-दिवाळी सण जवळ आल्याने धमाका सुरु झाला आहे. कदाचित जसे अजित पवारांच्या नेतृत्वात ९ मंत्र्यांनी शपथ घेतली तसेच पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रिमंडळ विस्तार होईल. शरद पवार (Sharad Pawar) गटातील काही नेते महायुतीत येण्यास इच्छुक आहेत. अनेक नेत्यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजितदादांशी चर्चा सुरू आहे. त्यांचा निर्णय होत असेल म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होतोय. (Maharashtra Politics News)

शंभुराज देसाई यांनी म्हटले की, एखादा मोठा नेता किंवा आमदारांचा एक गट जर महायुतीला समर्थन देण्यासाठी सरकारमध्ये येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू .

दरम्यान, देसाई यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता महायुतीत सहभागी होऊ शकतो असे देसाई यांनी म्हटल्याने हा मोठा नेता कोण आहे याची चर्चा सुरु आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पुन्हा एकदा विस्तार होणार आहे. या संदर्भात राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या
वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. तसेच दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे समजते.
सध्या राज्य मंत्रिमंडळात २९ कॅबिनेट मंत्री आहेत. त्यातील भाजपचे १०, शिंदे गटाचे १० आणि अजित पवार गटाचे
९ मंत्री आहेत. एकूण मंत्री संख्या जास्तीत जास्त ४३ राहू शकते. म्हणजेच आगामी विस्तारामध्ये आणखी
चार राज्यमंत्र्यांसह १४ मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.

मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला आठ मंत्रिपदे हवी आहेत. शिंदे गटाला ३ आणि
अजित पवार गटाला ३ मंत्रिपदे असतील, असे भाजपचे मत आहे. परंतु, दोन्ही मित्रपक्षांना प्रत्येकी किमान ४ मंत्रिपदे हवीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’

Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil | शाई फेक योग्य नाही – आमदार रोहित पवार

Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 49 वी स्थानबध्दतेची कारवाई