Gopichand Padalkar | ‘त्या’ प्रकरणात गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्याच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील (Tanaji Patil) यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि तानाजी पाटील यांना सेशन कोर्टाने (Sessions Court) दणका दिला आहे. सेशन कोर्टाचे न्यायाधीश आर.व्ही. जगताप (Judge R.V. Jagtap) यांच्या समोर झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला (Pre-arrest bail application rejected) आहे. त्यामुळे पडळकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Sangli District Bank Election) धामधुमीत आटपाडीत 7 नोव्हेंबरला झालेल्या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू जानकर (raju jankar) यांनी केला. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांत दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी फिर्याद (FIR) देण्यात आली होती. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर खुनी हल्ल्याचा,
तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावर बेकायदा जमाव जमावल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात (Atpadi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण कडे (Local crime investigation) सोपवण्यात आला आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाकडून तालुक्यात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

 

पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची अलिशान चार वाहने जप्त केली आहे.
त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
त्यावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Gopichand Padalkar | sangli sessions court rejects bjp leader and mla gopichand padalkar bail plea on sangli atpadi attempt to murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Update | महाग झाले सोने, आता 28793 रुपयात मिळतेय 1 तोळा; इथं जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा आजचा नवीन दर

Pune Crime | पुण्यात 66 वर्षाच्या बहिणीची 70 वर्षाच्या भावाविरोधात फसवणूकीची तक्रार; जाणून घ्या वानवडीतील प्रकरण

Amruta Fadnavis | ‘आओ कुछ तूफानी करते है, कल शाम ….मी पुन्हा’… ! अमृता फडणवीस यांचं ट्विट