Pune Crime | पुण्यात 66 वर्षाच्या बहिणीची 70 वर्षाच्या भावाविरोधात फसवणूकीची तक्रार; जाणून घ्या वानवडीतील प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कॅप्टन असलेल्या आपल्या वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर मुलाने बनावट मृत्युपत्र (Fake will) तयार करुन आपली बहिण आणि आईची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६६ वर्षाच्या बहिणीच्या तक्रारीवरुन वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) ७० वर्षाच्या भावाविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

वसुंधरा अर्जुन राजवाडे (वय ६६, रा. विंडसर एव्हेन्यू, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजितसिंग हनुमंतराव जगताप (वय ७०, रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे भाऊ बहिण आहेत. त्यांचे वडिल कॅप्टन अर्जुन राजवाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या मिळकतीत फिर्यादी, आई व भाऊ असे सम प्रमाणात प्रत्येकी ३३.३३ टक्के हिश्याचे वारस आहेत. आरोपीने २००३ मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात (Deputy Registrar Office, Pune) फिर्यादी व त्यांचे आईचे वारस म्हणून असणारा हिस्सा परस्पर कमी करुन तो फक्त २६ टक्के हिस्सा ठेवला. वडिलांचे बनावट मृत्युपत्र तयार करुन स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेतला. तसेच वडिलांच्या मृत्युनंतर नुकसान भरपाई म्हणून कंपनीकडून फिर्यादीस मिळणारे २५ लाख २४ हजार ७८० रुपये आरोपीने फिर्यादीकडून विकसनाकरीता घेतले. तेथे इमारती बांधून भाड्यातून मिळणारी रक्कम स्वत: बळकावली आहे. फिर्यादीस त्यांची रक्कम परत न करता शिवीगाळ करुन धमकावले आहे. अशा तक्रारीवरुन गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 66-year-old sister lodges complaint against 70 year old brother in Pune; Know the case of Wanwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा