सरकारनं केलं सावधान ! EMI थांबविण्यासाठी कोणालाही तुमचा ‘हा’ नंबर देऊ नका, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने सोमवारी आपल्या ग्राहकांना नवीन प्रकारच्या सायबर क्राईमविषयी सावध केले आहे. एसबीआयनंतर आता सरकारनेही लोकांना सावध केले आहे. पीएमबीने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, बँकांनी ईएमआयच्या संदर्भात सायबर फसवणूकीपासून सावध असले पाहिजे, अशा फोन कॉल्सवर ते तुम्हाला ओटीपी शेअर करण्यास सांगतील. ही गोष्ट लक्षात ठेवा की, EMI टाळण्यासाठी ओटीपी शेअर करणे आवश्यक नाही त्यामुळे तुमचा ओटीपी शेअर करू नका.

एसबीआयने म्हटले आहे की, फसवणारे लोक ग्राहकांना कॉल करीत आहेत आणि त्यांच्या कर्जाची ईएमआय थांबविण्यासाठी ओटीपी शेअर करण्यास सांगत आहेत. एसएमआयने ट्विट केले की, ईएमआय न भरण्यासाठी ओटीपी शेअर करणे आवश्यक नाही. म्हणून आपण कोणाबरोबरही आपला ओटीपी शेअर करू नये. एकदा तुमचा ओटीपी शेअर केल्यावर फसवणूक करणारे तुमच्या खात्यातून त्वरित पैसे काढून घेतात. एसबीआयने आपल्या ग्राहकांना ओटीपी शेअर न करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना विषाणू महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता आरबीआयने 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कालावधीत सर्व भारतीय बँकांना / भारतीय वित्तीय संस्थांना त्यांच्या ईएमआय पेमेंटवर 3 महिन्यांसाठी परवानगी देऊन ग्राहकांना दिलासा दिला आहे. आरबीआयच्या सल्ल्यानंतर सरकारसह खासगी बँकांनी त्याचा फायदा ग्राहकांना दिला आहे.

फॉलो करा या सुरक्षा टिप्स
>> कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन परिस्थितीत फसवणूक करणारेही सक्रिय झाले असून ते यूपीआय आयडीमधून देणगी मागत आहे. बँकने सांगितले की, फसव्या यूपीआय आयडींकडून देणगी मागणाऱ्यांपासून सावध रहा. आपल्या कष्टाने मिळवलेले पैसे देण्यापूर्वी विचार करा.
>> निधी हस्तांतरित करण्यापूर्वी पैसे घेणार्‍याची ओळख तपासा.
>> कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर तुमच्या कार्डचा तपशील कधीही सेव्ह करु नका.
>> अनावश्यक ईमेलवर आपली संवेदनशील माहिती देऊ नका.
>> कोरोना विषाणूशी संबंधित कोणतीही बातमी त्यावर क्लिक करण्यापूर्वी तपासा.
>> जेव्हा तुम्हाला घोटाळ्याची शंका वाटेल तेव्हा त्वरित तक्रार द्या.