GST रिफंडचा खोटा दावा करणारे ५००० निर्यातदार संशयाच्या भोवऱ्यात ; सखोल चौकशीनंतर होणार निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारने बोगस चलन आणि बिलांद्वारे GST रिफंड चा खोटा दावा करणाऱ्या ५,१०६ संशयित निर्यातदारांना ओळखले आहे. अशा निर्यातदारांच्या दाव्यांची पडताळणी केवळ इलेकट्रॉनिक पद्धतीने करण्याऐवजी सखोल चौकशी करूनच मानवी पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्यात तथ्य आढळल्यास रिफंड केले जाईल. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार इंटीग्रेटेड जीएसटी (IGST) रिफंड च्या अशा फसवणुकीचे दावे १,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक देखील असू शकतात.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) योग्य कागदपत्रांसहित खरोखरच तथ्य असणारे दावे दाखल करणाऱ्या निर्यातकांना मात्र दिलासा देत त्यांची रिफंड ची प्रक्रिया ‘आटोमेटेड’ पद्धतीने आणि वेळेवरच होईल असे स्पष्ट केले.

संशयाच्या भोवऱ्यात केवळ ३.५ टक्के निर्यातदार :
सीबीआयसी (CBIC) ने सोमवारी आपल्या सीमा शुल्क आणि जीएसटी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की त्यांनी ठरलेल्या मानकांनुसार ‘जोखिम’ वाल्या संशयित निर्यातदारांच्या कर क्रेडिट (ITC) ची चौकशी करून सत्यापन करावे. सूत्रांनी सांगितल्यानुसार एकूण १.४२ लाख निर्यातदारांपैकी केवळ ५,१०६ निर्यातदारांची ओळख संशयित निर्यातदारांच्या रूपात झाली आहे. हे एकूण निर्यातदारांपैकी केवळ ३.५ टक्के आहे. सीबीआयसी (CBIC) ने सांगितलेल्या माहितीनुसार या निर्यातकांना देखील निर्यातीची परवानगी लगेच दिली जाईल मात्र त्यांच्या रिफंड बद्दल निर्णय जास्तीत जास्त ३० दिवसांमध्ये आईटीसी च्या सत्यापनानंतर केले जाईल.

मानवीय पद्धतीने तपासाचे कारण फसवणूक पकडणे हेच :
सीबीआईसी (CBIC) सांगितले कि IGST रिफंड ची इलेकट्रॉनिक ऐवजी मानवीय पद्धतीने तपास करण्याचे कारण म्हणजे गडबडीने आणि अफ़रातफरीचे व्यवहार करणाऱ्या निर्यातदारांची फसवणूक पकडणे हे आहे. त्यांनी म्हटले आहे कि मागील दोन दिवसात म्हणजे १७ आणि १८ जून रोजी ९२५ निर्यातकांकडून पाठवल्या जाणाऱ्या सामानापैकी केवळ १,४३६ बिलांना रोखले आहे. सीबीआईसी ने म्हटले कि ९,००० निर्यातक रोज २०,०००बिल जमा करतात. यांच्या तुलनेत अडविलेल्या बिलांची संख्या अत्यंत कमी आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा