रावणरुपी रामावर सरकार कारवाई करणार का? : आमदार डॉ मनीषा कायंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
भारतातील सर्वात मोठी दहीहंडी असा प्रचार करून लाखो रुपयांची उधळण करणारे भाजपचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी उत्सवाच्या व्यासपीठावरून समस्त महिलावर्गाचा जाहीर अपमान केला आहे. भाजप सरकार आता या रावनरुपी रामावर काय कारवाई करणार याकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी रावणरूपी या रामावर राज्य सरकार कारवाई करणार का? असा सवाल शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे.

राम कदम यांच्या बेताल वक्तव्याविरोधात मनसे,राष्ट्रवादी,काँग्रेस महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन

जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर ती पळवायला मी तुम्हाला एक आमदार म्हणून मदत करेन, असे जाहीर विधान केल्यामुळे समाजातील विविध स्तरातून कदम यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी हा लोकांच्या सेवेसाठी लोकांनी निवडून दिलेला असतो परंतु राम कदम यांनी जाहीर कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत असे व्यक्तव करणे म्हणजेच सरकारची लोकशाहीवरील पकड कमजोर झाल्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या व्यक्तवाची दखल घेऊन महिला आयोगाच्या देखरेखी खाली योग्य कारवाई करावी. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या या पावनभूमीचा आपण अपमान केल्यासारखेच होईल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेची ओटी भरून तिला सन्मानाने घरी पाठवले होते. या ऐतिहासिक घटनेची जाण नसलेल्या राम कदम यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांना पक्षातील सर्व पदावरून काढून टाकावे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे, असे आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B01FM7GGFI,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2187838-b127-11e8-b87b-811615063561′]