चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘बलात्कार्‍यांना शक्ती देण्याचं काम करतंय सरकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लातूरमधील एका 60 वर्षाच्या महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेतील पीडित महिलेने आत्महत्या (sucide) केल्याच्या घटनेने महाराष्ट्र (Maharashtra) हादरून गेला आहे. त्यामुळे राज्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बलात्काराची (Rape)घटना अहमदपूर येथे घडली होती. अपमान सहन न झाल्याने महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली. या घटनेवरून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) टीका केली आहे. तसेच, राज्य सरकार (State Government) बलात्काऱ्यांना शक्ती देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

लातुर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बलात्काराच्या गुन्ह्यात किशन उगाडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीने पीडित मयत महिलेला विश्वासात घेऊन वाकी नदीच्या जवळच्या शेतात नेले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेच्या सुनेनं दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. मात्र, आपली इज्जत लुटल्याने, अपमान झाल्याच्या भावनेतून पीडितेने तलावात उडी घेत आत्महत्या केली. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेची दखल घेत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राज्य सरकारवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे, राज्यात बलात्काऱ्यांना ‘शक्ती’ देण्याचं काम सरकार करतंय, ज्यामुळे या विकृतांचे मनोबल वाढलेलं दिसतंय. तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, ना कि तपास व चौकशीच्या नावाखाली अभय, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय. तसेच रायगडमधील आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरुनही सरकारला धारेवर धरलंय. समाजात विकृती फोफावत आहे. पण तिला जेरबंद करायला शासन कमी पडत आहे हे नक्की. कायदे आणतयं पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना मात्र विकृतांना पाठीशी घालायची शासनाची भूमिका असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.