home page top 1

मुलीसमोरच अभिनेता गोविंदा झाला पत्नीसोबत ‘रोमँटीक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार गोविंदा सध्या सिनेमांपासून दूर आहे. परंतु तो अनेक पार्टीज आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसत असतो. नुकतचे गोविंदाचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत तो पत्नी सुनीता आहुजा सोबत दिसत आहे.

समोर आलेल्या फोटोत दिसत आहे की, गोविंदा आपल्या पत्नीसोबत रोमँटीक डान्स करताना दिसत आहे. नुकतीच गोविंदाने पत्नी सुनीता, मुलगी टीना आणि म्युझिक कंपोझर गजेंद्र वर्मा सोबत कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.

गोविंदा आपल्या मुलीचं गाणं मिलो ना तुम या गाण्याच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी सगळे मस्ती करताना दिसले. सुनीताने रेड सूट घातला होता ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. टीनाही गोल्डन ड्रेसमध्ये गॉर्जस दिसत होती.

फोटोत दिसत आहे की, गोविंदा आपल्या पत्नीसोबत रोमँटीक डान्स करत आहे. याशिवाय तो सुनीताच्या भांगात कुंकू भरतानाही दिसत आहे. चाहत्यांना गोविंदाचे हे फोटो खूपच आवडले आहेत. गोविंदा रंगाली राजा या सिनेमात शेवटचा दिसला होता.

image.png

image.png

image.png

image.png

image.png

image.png

visit : policenama.com 

Loading...
You might also like