Govt Yojana | जर तुमच्या मोबाइलमध्ये सुद्धा आलाय ‘हा’ मेसेज तर व्हा सावध, जाणून घ्या काय लिहीलंय त्यामध्ये ?
नवी दिल्ली : वृत्त संस्था – Govt Yojana | जर तुमच्या मोबाइलवर सुद्धा ‘Govt Yojana’ चा मेसेज आला असेल तर ताबडतोब सतर्क व्हा. कारण या मेसेजमुळे फसवणुक (Fraud) होऊ शकते. सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने वायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सरकारने सरकारी योजनेच्या अंतर्गत तुमच्या अकाऊंटमध्ये 2.67 लाख रुपये क्रेडिट केले आहेत.
ऑनलाइन फसवणुक करणारे गुन्हेगार स्मार्टफोन यूजर्सला चूना लावण्याच्या तयारीत असतात. यासाठी ते रोज नवनवीन पद्धती वापरतात. आता या प्रकारच्या एका फ्रॉडबाबत पीआयबीने इशारा जारी केला आहे.
मेसेजमध्ये केला जात आहे हा दावा
‘Govt Yojana’ अंतर्गत तुमच्या अकाऊंटमध्ये 2.67 लाख रुपये क्रेडिट झाले आहेत. जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर ताबडतोब खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने जेव्हा या मेसेजची तपासणी केली तेव्हा तो बनावट असल्याचे आढळून आले. सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही.
PIB फॅक्ट चेकने केले हे ट्विट
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट लिहिले आहे की, सरकारी योजनेंतर्गत 2,67,000 रुपये खात्यात जमा करण्यात आले आहे असा मेसेज तुम्हाला आला आहे का? जर होय तर सावध व्हा. हा मेसेज पूर्णपणे फेक आहे. भारत सरकारची अशी कोणतीही योजना नाही.
अशा कोणत्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि लिंकवर क्लिक करू नका.
Web Title : Govt Yojana | alert if you also receive a message
of your account has been credited rs 267000 under govt yojana
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page
and Twitter for every update
Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल;
जाणून घ्या प्रकरण