Grahak Peth Pune | ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवात बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणी पर्यंत तब्बल 45 प्रकार; अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या – ‘गृहिणींकरीता विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Grahak Peth Pune | जीवनावश्यक वस्तू उत्तम पद्धतीने घरपोच पोहोचविण्याची सेवा ग्राहक पेठ (Grahak Peth Pune) व इतर संस्था देत आहेत. पुण्याने मला ख-या अर्थाने मोठे केले. पुण्यामध्ये आता अनेक प्रकारचे महोत्सव होतात. परंतु या महोत्सवांची सुरुवात ग्राहक पेठेने तांदूळ महोत्सवाच्या (Grahak Peth Tandul Mahotsav) माध्यमातून केली. गृहिणींकरीता असे विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी असते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी (Mrunal Dev Kulkarni ) यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ (Sadashiv Peth) खजिना विहिर चौक (Khajina Vihir Chowk Pune) येथे आयोजित २९ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे (Sandhya Bhide), कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक (Suryakant Pathak), जयराज अ‍ॅन्ड कंपनीचे राजेश शहा (Rajesh Saha), महोत्सवाचे प्रमुख शैलेश राणिम (Shailesh Ranim) यावेळी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात पहायला मिळत आहेत. उद््घाटनप्रसंगी मावळमधील शेतक-यांचा देखील सन्मान करण्यात आला. (Grahak Peth Pune)

राजेश शहा म्हणाले, मागील २९ वर्षांपासून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरु आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यत या माध्यमातून पोहोचत आहे. तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ या महोत्सवात ग्राहकांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणे, हे याचे वैशिष्टय आहे.

 

 

सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ,
भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने
पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात अत्यल्प दरात उपलब्ध आहे.
तरी ग्राहकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Web Title :- Grahak Peth Pune | As many as 45 varieties from Basmati, Ambemohor, Dubraj to Indrayani in the Consumer Peth Rice Festival; Actress Mrunal Dev-Kulkarni says – ‘Different types of festivals are a unique occasion for housewives’


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय

Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘एसटी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’

Post Office Internet Banking | पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नेट बँकिंगची सुविधा, कशी करू शकता अ‍ॅक्टिव्ह? जाणून सविस्तर प्रक्रिया

Karuna Sharma | धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याच्या घोषणेवरून करुणा शर्मा म्हणाल्या…

Rakesh Jhunjhunwala चा ‘हा’ स्टॉक पोहचला ऑल-टाइम हाय ! पुढे काय आहे शक्यता? जाणून घ्या