‘त्या’ कारणावरुन ग्रामसेवकासह उपसरपंचाला बेदम मारहाण

वैजापूर : पोलीसनामा ऑनलाईन – दोघांनी मिळून ग्रामसेवकास शिवीगाळ आणि त्यावेळी तेथे उभ्या असणाऱ्या उपसरपंचास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ‘तू’ गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमास का आला नाहीस,’ असा जाब विचारत सदर दोघांनी ग्रामसेवकास शिवीगाळ आणि उपसरपंचास मारहाण केली. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली आहे. तालुक्यातील गारज येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. मुख्य म्हणजे दोघांविरुद्धा या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय ?
नुकत्याच बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. यासाठी तालुक्यातील गारज येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कडूभाऊ आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गारज येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात त्यांनी आपली पिशवी ठेवली आणि यानंतर ते परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघाले. यावेळी विशाल सरोवर व शुभम सरोवर हे दोघे तेथे आले. यानंतर त्यांनी कडूभाऊ यांना, ‘तू गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमास का नाही आला,’ असा प्रश्न विचारला आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे उपसरपंच सुरेश सरोवर हेही उभे होते. ते हा सर्व प्रकार पाहत होते. त्यावेळी त्या दोघांनी ‘तू आमच्याकडे काय बघतोस. तू काय करून घेशील’ असे धमकावत त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरच हा सर्व प्रकार घडला आहे.
यानंतर याप्रकरणी गारजचे ग्रामसेवक आहेर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंचास करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विशाल सरोवर व शुभम सरोवर (दोघेही रा. गारज ) या दोघांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार विश्वजीत कासले हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.