5 वर्षांची नात म्हणाली – ‘तु सर्व पेरू खाऊन टाकले’; रागाने आजीने अ‍ॅसिड पिऊन दिला जीव

इंदौर (indore) : मध्य प्रदेशच्या इंदौरमधून (Indore)  हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे, येथे 75 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने अ‍ॅसिड (ACID) प्यायले. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी महिलेला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की, 5 वर्षांच्या निष्पाप नातीच्या बोलण्याचा आजीला इतका राग आला की, आजीने रागाच्या भरात हे पाऊल उचलले.

ज्येष्ठ महिला आपल्या 5 वर्षाच्या नातीच्या बोलण्याने नाराज झाली होती. मुलीने आपल्या आजीला म्हटले होते की, तु तर झाडावर लागलेले सर्व पेरू खाल्ले. नातीचे हे बोलणे महिलेला खुप लागले, तीने रागाच्या भरात अ‍ॅसिड (ACID) प्यायले. बेटमा पोलिसांनी (Betma Police)  या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

मृत महिलेचा मुलगा कैलास कुशवाह याने सांगितले की, माझी 5 वर्षांची मुलगी बोलल्यानंतर आईने अ‍ॅसिड (ACID) प्यायले आणि म्हणाली सर्व पेरू मी एकटीने खाल्ले नाही. छोटी मुलगी सुद्धा आता तोडून बोलू लागली आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बेटमा पोलीस ठाण्याचे (Betma Police Station) इन्चार्ज मनोहर बघेल (Manohar Baghel) यांनी सांगितले की, मृत महिलेचे नाव मीरा बाई आहे. ज्या बेटमाच्या मंत्री नगरच्या राहणार्‍या आहेत. 5 वर्षांच्या नातीने आजीला सर्व पेरू तू खाल्ले, असे म्हटले होते. यावरून नाराज होऊन आजीने अ‍ॅसिड (ACID) प्यायले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.