३ महिन्याच्या नातीचा आजीकडून गळा दाबुन खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

बाळांतीन झाल्यानंतर ३ महिन्यातच आईचे दुध कमी झाल्याने आणि औषधाला पैसे नसल्याने आजीनेच आपल्या ३ महिन्याच्या नातीचा गळा दाबुन खून केल्याची धक्‍कादायक घटना कोल्हापुरमधील यादवनगर परिसरातील कोटीतीर्थ वसाहतीमध्ये घडली. यामुळे कोल्हापुरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f97abdc7-ca38-11e8-9dc6-a52913e984c1′]

याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आजी महोबतबी आदम मुल्‍ला हिला ताब्यात घेतले असुन महोबतबी यांची सुन शहनाज शब्बीर मुल्‍ला हिने फिर्याद दिली आहे. शिफाना (वय 3 महिने) असे त्या दुर्देवी मुलीचे नाव आहे. शहनाजी यांचा शब्बीर मुल्‍ला यांच्याशी मे २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना ३ महिन्यांपुर्वी शिफाना ही मुलगी झाली. शहनाज या अशक्‍त असल्याने त्यांच्या दुधावर बाळाचे पोट भरत नव्हते. त्यामुळे दुध पावडर आणुन शिफानाला द्यावे लागत होते. नेहमी खर्च होत होता. त्यावरून शहनाज यांची सासु महोबतबी या नेहमी टोमणे मारत होत्या आणि शब्बीरचे दुसरे लग्‍न करून देण्याची धमकी देखील देत होत्या.

सकाळी सासु महोबतबी या शिफानाला घेवुन बाहेरच्या रूममध्ये बसल्या होत्या. शहनाज या घरात आवराआवरी करीत होत्या. काही वेळानंतर देखील शिफानाचा काही एक आवाज न आल्याने त्यांनी बाहेर येवुन पाहिले असता शिफाना काही एक हालचाल करीत नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी शिफानाला हलवुन उठविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना तिच्या गळ्यावर वळ दिसून आला. तात्काळ शिफानाला सीपीआर मध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापुर्वीच शिफानाला मयत घोषित केले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff8e5fb1-ca38-11e8-a789-0fa6061b0537′]

आजीनेच नातीचा गळा दाबुन खून केल्याची बातमी पसरताच कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सासु महोबतबीला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास राजारामपुरी पोलिस करीत आहेत.