Gratuity Funds | PF खात्यावर आता किती मिळेल व्याज, 1 ऑक्टोबरपासून आले नवीन रेट; जाणून घ्या
नवी दिल्ली : Gratuity Funds | सरकारने General Provident Fund (GPF) च्या नंतर बिगर सरकारी Provident चा नवीन व्याजदर जारी केला आहे. या अंतर्गत 1 ऑक्टोबर 2021 पासून 31 डिसेंबर 2021 च्या दरम्यान Non-Government Provident, Superannuation and Gratuity Funds वर 7.1 टक्के व्याज मिळेल. हेच दर 1 ऑक्टोबरपासून प्रभावी झाले आहेत.
सरकारचे जॉईंट सेक्रेटरी आशीष वचानी यांच्यानुसार हा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने General Provident Fund, Contributory Provident Fund, All India Services Provident Fund, State Railway Provident Fund, General Provident Fund Defence, Indian Ordnance Department Provident Fund, Indian Ordnance Factories Workmens Provident Fund, Indian Naval Dockyard Workmens Provident Fund, Defence Services Officers Provident Fund, Armed Forces Personnel Provident Fund चे नवीन व्याजदर जारी केले होते.
काय झाला बदल
PF खात्यावरील व्याजात बदल करण्यात आलेला नाही. तसेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या लघु बचत योजनांवर 2021-22 च्या तिसर्या तिमाहीसाठी व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एनएससीवर वार्षिक व्याजदर सुद्धा 6.8 टक्के कायम राहील. (Gratuity Funds)
Small Saving Schemes वर व्याजदर
अर्थ मंत्रालयाने नोटिफिकेशनमध्ये सांगितले होते की, Small Saving Schemes वर व्याजदर 2021-22 च्या तिसर्या तिमाहीसाठी तेच राहतील.
अशाप्रकारे 5 वर्षाच्या Senior Citizen Saving Scheme वर व्याजदर 7.4 टक्केवर कायम आहे.
वरिष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत व्याज तिमाही आधारावर मिळते. बचत जमावर व्याज 4 टक्के मिळेल.
1 वर्ष ते 5 वर्षासाठी मुदत ठेवीवर व्याजदर 5.5 ते 6.7 टक्के असेल. तर 5 वर्षाच्या आवर्ती ठेवीवर व्याज 5.8 टक्के असेल.