‘वाइफ स्वॅपिंग’साठी दबाव आणत होता पती, पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गुजरातच्या अहमदाबाद शहरात वाइफ स्वॅपिंग म्हणजेच पत्नी अदलाबदल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, येथे राहणारी एक व्यक्ती आपल्या पत्नीवर वाइफ स्वॅपिंग करण्यासाठी दबाव आणत होता. त्या महिलेने प्रथम नकार दिला, परंतु पती ऐकत नसल्यामुळे तिने पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरण अहमदाबादच्या पॉश भागात एसडी हायवे रोडचे आहे. इथल्या बंगल्यात राहणाऱ्या एका महिलेने अहमदाबादमधील महिला पश्चिम पोलिस स्टेशन गाठले आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिचे लग्न सुमारे 14 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना आठ वर्षाचा मुलगा आहे. वाइफ स्वॅपिंग करण्यासाठी तिचा नवरा त्या महिलेवर दबाव आणत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्याच्या पत्नीने मित्राशी प्रेमसंबंध ठेवावेत अशी त्याची इच्छा आहे.

असे समोर आले पतीचे सत्य

या महिलेने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी तिला तिच्या पतीच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाली. तो आपल्या मित्राच्या पत्नीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. यावर महिलेने नाराजी व्यक्त केली असता घरात वाद सुरु झाला. कुटुंबाच्या सन्मानामुळे ती गप्प राहिल्याचेही महिलेने सांगितले.

नवऱ्याने दिली बायकोला वाइफ स्वॅपिंगची ऑफर

या महिलेचे म्हणणे आहे की, काही काळानंतर तिचा नवरा तिच्यावर पत्नी अदलाबदल करण्यासाठी दबाव आणू लागला. नवऱ्याने पत्नीला अदलाबदल करण्याविषयी बोलले जेणेकरून त्याचा दुसर्‍या महिलेशी संबंध रहावा. महिलेने स्पष्टपणे नकार दिला, परंतु पतीने तिच्यावर दबाव आणला. असे सांगितले जात आहे की, महिला अस्वस्थ झाल्यावर ती आपल्या मुलासह आपल्या माहेरी गेली होती. यानंतरही, नवऱ्याने फोनवर त्या महिलेला वाइफ स्वॅपिंग करण्यासाठी बोलू लागला, तेव्हा महिला वैतागून पोलिसांकडे पोहचली.