भाजपच्या मनमानीला झटका ! ‘या’ दिग्गज खासदाराचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनसुखभाई वासवा (Mansukhbhai Vasava) यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. असं समजत आहे की, पक्षाच्या मनमानीला कंटाळून त्यांनी हे पाऊल टाकलं आहे.

लोकसभेचाही राजीनामा जाहीर
नेतृत्वाकडून आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्यानं मनसुखभाई नाराज होते. भाजप प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहित त्यांनी आपली नाराजी कळवली देखील होती. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण लोकसभेचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

इको सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्याची मागणी
मसनुखभाई वासवा भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थि केल्यानं चर्चेत आले होते. त्यांनी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या समोर राज्यातील आदिवासी महिलांच्या तस्करीचा मुद्दा मांडला होता. तसंच पीएम मोदींनाही त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या मुद्द्यावरून पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या जवळपासचा इको सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती. वासवा याच वर्गाशी संबंधित आहेत. पंरतु त्यांच्या म्हणण्याकडे पक्षानं साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळं कंटाळलेल्या वासवा यांनी अखेर राजीनामा सोपवण्याचा निर्णय घेतला.