धक्कादायक ! पत्नीचे ‘नग्न’ फोटो तिच्याच वडिल, भावाला पाठवले

अहमदाबाद : वृत्तसंस्था – व्हॉट्स अ‍ॅपव्दारे पत्नीचे नग्न फोटो तिच्याच वडिलांना आणि भावाला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार अहमदाबादमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नग्न फोटो पाठवल्याप्रकरणी पतीला अटक् केली आहे. नग्न फोटो पाठवणाऱ्याने यापुर्वीच दुसरे लग्न केले असून त्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये यापुर्वीच त्याच्याविरूध्द गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दिव्यांग परमार असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीतेच्या भावाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. दिव्यांगने तक्रारदाराच्या बहिणीचे तब्बल ७ ते ८ नग्न फोटो व्हॉट्स अ‍ॅपवर त्यांना पाठवले होते. तक्रारदाराच्या वडिलांसह इतर एकाला हे फोटो दिव्यांगने पाठविल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. १३ एप्रिल रोजी तक्रारदाराच्या मोबाईल दिव्यांग परमारचा व्हॉट्स अ‍ॅप आला होता. तो त्यांनी पाहिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. फोटो पाठवून दिव्यांगने मी काय करू शकतो याचे हे एक उदाहरण आहे अशी धमकी देखील तक्रारदारास दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलो हायकोर्ट पोलिसांनी दिव्यांगविरूध्द सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराच्या बहिणीचे फेब्रुवारी २०१८ मध्ये दिव्यांग परमारसोबत लग्न झाले होते. त्यानंतर काही दिवसानंतरच दिव्यांगने दुसरे लग्न केले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदाराच्या बहिणीने दिव्यांगविरूध्द गांधीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावेळी देखील त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ बदनामीच्या उद्देशाने दिव्यांगने पत्नीनेच नग्न फोटो पाठवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –