Gulabrao Patil | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरुन गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंवर संतापले, म्हणाले -‘आधी जावयाला जेल बाहेर काढा आणि मग…’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आरोप केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आधी जावयाला बाहेर काढावे आणि मग एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करावेत, अशा शब्दांत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खडसे यांना सुनावलं. दोन नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, भोसरी प्रकरण कोणी केलं, आपण काय संत आहेत का? आपलं बाळू आणि दुसऱ्याचं काळू असं कसं चालेल, असं म्हणत पाटील यांनी खडसेंना टोला लगावला. पहिले आपल्या जावयाला सोडवा ते कोणत्या कारणावरुन जेलमध्ये आहेत. त्यांना बाहेर काढा, ते का साधूसंत आहेत म्हणून जेलमध्ये आहेत का? कृपया करुन त्यांनी आधी जावयाला बाहेर काढावे आणि मग एकनाथ शिंदेंवर आरोप करावा अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेची गाडी सुसाट…
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या चाळीस आमदारांचं टायटॉनिक जहाज बुडेल अशी टीका केली होती. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, कुणी खोके म्हणा कुणी जहाज म्हणा मात्र आमच्या एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट भाग रही है, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

 

सुषमा अंधारेच्या टीकेला प्रत्युत्तर
राज्यपाल यांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला मी मान्यता दिलेली नाही,
असे म्हणत राज्यपाल यांच्यावर बोलणारे सर्वात पहिले आम्ही होतो असे म्हणत गुलाबराव पाटील
यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या टीकेवर पलवार केला.

 

Advt.

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil allegation on eknath khadse on cm eknath shinde issue jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला