Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची केंद्रीय मंत्र्यावर खरमरीत टीका, म्हणाले – ‘नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gulabrao Patil | केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची मागील तीन दिवस झाली जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. यासाठी ते मुंबईत आहेत. राणे यांनी शिवसेना नेते (Shiv Sena) आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरून मोठं विधान केलं होतं. या विधानावरून आता शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली आहे. ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचं म्हणत आहे, अशा शब्दात पाटील यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

नारायण राणेंनी केलेल्या विधानावरून मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारल्यावर त्यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा आता निघाला आहे. आधी ते शिवसेनेत अस्वस्थ होते. मग ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघू उद्योग खातं मिळालं. त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे, असा हल्लाबोल देखील गुलाबराव पाटलांनी (Minister Gulabrao Patil) नारायण राणेंवर केला आहे.

SIP Mutual Funds | 17500 रुपये गुंतवून तुम्ही सुद्धा बनू शकता 5 कोटीचे मालक, जाणून घ्या कसे

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा शिंदेंबाबतच अंदाज हा हवामान खात्याप्रमाणे चुकीचा ठरणारा आहे. असं गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते नारायण राणे?

‘शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेवर (Shiv Sena) नाराज
असून ते लवकरच भाजपामध्ये येणार असल्याचं खळबळजनक विधान केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि
मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी केलं होतं. केंद्रीय
मंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर नारायण राणे यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. याच दरम्यान
त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असल्याचा आरोप करीत त्यांना आपण भाजपमध्ये
घ्यायला तयार असल्याचेही राणे यांनी म्हटले होते. या विधानावरून शिवसेना नेते आणि मंत्री
गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राणेंवर सडकून टीका केली. तसेच, तत्पूर्वी
नगरविकास खात्यात अथवा आपल्या कामामध्ये मातोश्रीवरुन कोणताही हस्तक्षेप होत नसल्याचा निर्वाळा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! मुलांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, जाणून घ्या प्रकरण

Health Insurance Reimbursement Claim | कसा दाखल करावा आरोग्य विमा प्रतिपूर्ती दावा, जाणून घ्या पूर्ण पद्धत


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gulabrao Patil | narayan rane got micro industry ministry so his head also became micro slams shiv sena leader

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update