Gulabrao Patil On Eknath Khadse | ‘खडसे राष्ट्रवादी संपवायला निघालेत…’; गुलाबराव पाटलांची पुन्हा एकदा जोरदार टीका

ADV

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Gulabrao Patil On Eknath Khadse | जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Gulabrao Patil On Eknath Khadse)

 

ADV

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात जोरदार लढत झाली. या निवडणुकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजी मारत खडसे यांचा पराभव केला. या पराभवानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात, शरद पवारांनी तुम्हाला दिलेली एमएलसी पण वापस घेतली पाहिजे. एकनाथ खडसे यांची ताकद कमी करण्यामध्ये त्यांचा स्वतःचा हात आहे. जिल्ह्यातील अर्धी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंबरोबर नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली.

एकनाथ खडसेंचा पलटवार
गुलाबराव पाटील यांच्या टीकेला आता एकनाथ खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटलांनी मला एमएलसी दिलेली नाही, या शब्दात एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे.
तसेच एखाद्या चिन्हावर जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने बलाबल समजेल.
गुलाबराव पाटील मंत्री असताना एक तरी ग्रामपंचायत शिवसेनेची का नव्हती? असा सवालदेखील त्यांनी गुलाबराव पाटलांना विचारला आहे.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दोन मंत्री, पाच आमदार माझ्याविरोधात उभे आहेत हीच माझी ताकद असल्याचे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
आता गुलाबराव पाटील यावर काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Gulabrao Patil On Eknath Khadse | jalgaon dudh sangh election result gulabrao patil and eknath khadse criticize each other

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aaditya Thackeray | ‘समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं, पण नातवालाच…’; आदित्य ठाकरेंनी व्यक्त मनातली खंत

Subramanian Swamy | सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींची केली रावणाबरोबर तुलना

Shriya Saran | श्रिया सरनच्या ‘या’ वक्त्यव्यामुळे ती चर्चेत; ‘या’ महिला अभिनेत्रीवर क्रश असल्याचे सांगितले