Shriya Saran | श्रिया सरनच्या ‘या’ वक्त्यव्यामुळे ती चर्चेत; ‘या’ महिला अभिनेत्रीवर क्रश असल्याचे सांगितले

पोलीसनामा ऑनलाइन टीम : ‘दृश्यम 2’ या चित्रपटातून श्रिया सरन (Shriya Saran) चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटामुळे ती चर्चेत आली होती. पुन्हा एकदा श्रिया सरन (Shriya Saran) तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. श्रियानी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

 

श्रिया सरनने एका महिला अभिनेत्रीवर तिचे क्रश असल्याचे उघडपणे सांगितले. तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना तर मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच श्रियाचा एक व्हॉइस नोट समोर आल्याने तो सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला होता. या व्हॉइस नोटमध्ये तिने तब्बूवर खूप प्रेम असल्याचे म्हटले आहे.

जेव्हा ती पहिल्यांदा तब्बूला भेटली तेव्हा ही तिचे तब्बूवर प्रेम होते आणि आताही आहे अशी कबुली तिने दिली आहे.
तिच्या या वक्तव्यानंतर तब्बूला खूप हसू आले होते आणि ऐकून आनंद देखील झाला होता.
श्रिया (Shriya Saran) यावेळी म्हणाली की तब्बू प्रत्येक वेळी मला प्रेरणा देत असते.
माझा तिच्यावर क्रश आहे. अभिनयासोबतच श्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
ती सोशल मीडियावर तिचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओज चाहत्यांसाठी शेअर करत असते.

 

 

Web Title :- Shriya Saran | the drishyam 2 actress shriya saran has a crush on female actress tabbu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा