पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी बाबा राम रहीम दोषी 

पंचकुला : हरयाणा वृत्तसंस्था – पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिमला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाची शिक्षा न्यायालयाच्या वतीने १७ जानेवारीला सुनावण्यात येणार आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावरून राम रहीमला  न्यायालयात हजर नकरता त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात समाविष्ट करून घेण्यात आले होते. या खटल्याच्या दरम्यात न्यायालयात आणि तुरुंगात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिम हा डेरा सच्चा सौदाच्या माध्यमातून करत असलेल्या काळ्या कामावर प्रकाश टाकण्याचे काम पत्रकार रामचंद्र छत्रपती करत होते.  त्यांचे एक वृत्तपत्र होते. ते वृत्तपत्र हरियाणा राज्यात आणि विषेत: राम रहिमच्या प्रसिद्धीच्या ठिकाणी प्रकाशित केले जात होते. या गोष्टीचा राग मनात धरून राम रहिमने त्याच्या गुंडा करून पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्या केली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या मुलाने त्यांच्या हत्ये नंतर न्यायालयीन लढा देऊन आपल्या वडिलांच्या हत्येला न्याय मिळवून दिला आहे.

भाजप शिवसेना युती होणार ? असा असेल युतीचा फॉर्मूला 

काय आहे पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरण २००२

पत्रकार रामचंद्र छत्रपती हे आपल्या ‘पूरा सच’  या वृत्तपत्रातून सतत राम रहिमच्या काळ्या कामावर प्रकाश टाकत होते. त्यांनी राम रहिमच्या डेऱ्यात चालणाऱ्या अमानवीय कृत्यांवर प्रकाश टाकल्याने पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या बद्दल मनात राग धरून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हे प्रकरण २००२ साली घडले होते. आज तब्बल १६ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला असून या निकालानंतर रामचंद्र छत्रपती यांच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

तत्कालीन पंतप्रधान अटल  बिहारी वाजपेयी यांना डेऱ्यातील  काळ्या कामाचा आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा वृत्तांत पीडित महिलांनी निनामी पत्राद्वारे कळवल्या नंतर अटल  बिहारी वाजपेयी यांनी चौकशीचे आदेश दिले. दिल्लीतून चौकशीचे आदेश आल्या नंतर सर्व प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यानंतर राम रहिमला शिक्षा व्हायला २०१७ चे साल उजडावे लागले. त्याच प्रमाणे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा तपास पुढे सरकत नव्हता तसेच तपासात कसलीच प्रगती दिसत नव्हती म्हणून त्यांच्या हत्येचा तपास २००३ साली सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या तपासात पत्रकार रामचंद्र छत्रपती यांना गोळ्या झाडणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या व्यक्तीने आपण डेरा सच्चा सौदाचे साधू आहोत असे दिलेल्या जबानीत म्हणले होते. असंख्य महिलानांवर लैंगिक अत्याचार करणारा बाबा राम रहीम दोन बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरला आहे. त्याला अटक होताच त्याच्या भक्तांनी  मोठा हिंसाचार घडलवला होता त्यात त्याचे अनेक भाविक जीवानिशी गेले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us