मुखेड तालुक्यात गुटखा व दारूची खुलेआम विक्री

मुखेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) –  शरीरासाठी गुटखा घातक असताना मुखेड तालुक्यातील काही ग्रामीण भागातील बहुतांश युवक नशेच्या आहारी जात आहेत. विशेष म्हणजे गुटखा विक्रीवर शासनाकडून बंदी असताना देखील ग्रामीण भागात गुटखा बिनधास्तपणे विकला जातो. गुटख्यावर शासनाकडून बंदी आली तेव्हा पासून ग्रामीण भागात गुटखा तस्करीने उच्छाद मांडला आहे. अन्न भेसळ अधिकारी व पोलीस प्रशासन गुटखा तस्करावर मेहेरबान आहेत की काय ? बंदी नंतरही ग्रामीण भागापर्यंत गुटखा पोहचतो कसा असा सवाल पालक वर्गाकडून विचारला जात आहे.

या महिलेने ४३ व्या वर्षी दिला २१ व्या बाळाला जन्म, म्हणाली अाता बस्स… 

अन्न व औषध प्रशासन विभाग गुटखा विक्रीवर गंभीर नसल्याने ग्रामीण भागात बिनधास्तपणे गुटखा विक्री होत असल्याचे चित्र आहे. व्यायम केल्याने शरीर चांगले बनते असे सांगण्यात येत होते. मात्र आजचा युवक व्यायाम करण्याऐवजी सकाळीच त्याच्या तोंडात गुटख्याची पुडी टाकताना दिसतो. या कारणाने बहूतांश पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण बेरोजगरामुळे कमी वयात दारूच्या आहारी जाऊन बर्बाद होत आहेत. दारूमुळे ग्रामीण परिसरातील गावात भांडण तंट्याचे प्रमाण वाढत आहे. अपघाताचे प्रमाण सुद्धा वाडले आहे. परिसरातील गुटखा व दारूच्या आहारी गेलेले तरुण वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त झाले आहेत. त्यामुळे पालकांना आर्थिक झळ पोहचत आहे.

हा प्रकार कधी संपेल ? अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन यावर ठोस पाऊल कधी उचलेल. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.