कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांवर हडपसर पोलीसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शाळा, महाविद्यालय जाणाऱ्या मुलींना त्रास देणे हाच काहीसा हेतु काही मुलांचा असतो. अश्या मुलांमुळे मुली घराच्या बाहेर निघण्यास घाबरतात. अश्याच मुलांना चपराक बसविण्यासाठी हडपसर पोलीसांनी तीन पथके तयार करुन कॉलेज परिसरात फिरणाऱ्या २८ टवाळखोर तरुणांवर कायदेशीर कारवाई केली आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85f10d00-b376-11e8-8331-8be7d1568684′]

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या शाळा, कॉलेज परिसरात टवाळखोर मुलांचा वावर वाढला असून त्याचा त्रास कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींना होत आहे. अश्या टवाळखोर मुलांना आवर घालण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील शिक्षक तसेच पालकांनी  हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावर कारवाई करत हडपसर पोलीसांनी टवाळखोरांना आवर घालण्यासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत. पोलीसांच्या विशेष पथकांनी शुक्रवारी (दि.७) साधना शाळा व कॉलेज, आण्णासाहेब मगर कॉलेज, व एस. एम. जोशी कॉलेजच्या परिसरात फिरणाऱ्या २८ टवाळखोर तरुणांवर कारवाई केली. पोलिसांच्या विशेष पथकांनी सकाळी दाह वाजल्यापासुन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान ही कारवाई केली.

जाहिरात

शिक्षक आणि पालकांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांचे विशेष पथक शाळा तसेच महाविद्यालयीन परिसरात नजर ठेऊन होते. काही टवाळखोर मुले शाळा व कॉलेजच्या परिसरात मोटार सायकलीवरुन काही कारण नसताना मुलींची टिंगल टवाळी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.  हडपस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक संजय चव्हाण, प्रमोद लोणारे, पोलीस उप निरिक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार युसुफ पठाण, राजेश नवले, संपत औचरे, पोलीस नाईक राजु वेगरे, प्रमोद टिळेकर, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, पोलिस शिपाई नितीन मुंढे, अकबर शेख, नामदेव बंडगर, प्रशांत टोणपे, गोविंद चिवळे यांनी टवाळखोरी करण्याऱ्या जवळपास २८ मुलांना ताब्यात घेतले.

जाहिरात

ताब्यात घेण्यात आलेल्या टवाळखोर मुलांकडून मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या २८ मुलांपैकी २२ मुलांवर कारवाई करत त्यांच्यावर मोटार सायकलीवर मोटार वाहन कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तर उर्वरित ६ मुलांना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच, २२ मुलांनच्या पालकांनाही बोलावून समज देण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल तांबे यांनी सांगितले. तसेच अश्या प्रकारची कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे. टवाळखोरांकडून  नागरिकांना त्रास होत असल्यास त्यांनी हडपसर पोलीसांकडे संपर्क साधावा असे आवाहन देखील तांबे यांनी केले आहे.

ही कारवाई परिमंडळ – ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड,वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांच्या पथकाने केली

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी