संरक्षण भिंतीवरून उडी मारून जाताना चिमुकल्याचा मृत्यू

हदगाव : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील मोठी बाजारपेठ आसलेले तामसा येथील जि. प. हायस्कुल प्रशाळेतील इयत्ता ८वी मध्ये शिकणारा १४ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या संरक्षक भिंतीवरील गज पोटात घुसल्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना दिनांक २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास घडली असुन विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्याच्या मृत्युबद्दल तामसा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून तामसा ता. हदगाव येथील जि. प. प्रशाळेतील १४ वर्षीय विद्यार्थी जगदीश गजानन गजभारे असे या विध्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता ८ वी क मध्ये शिक्षण घेत होता.

शाळेच्या हजेरी पटात त्याचा अनुक्रमाक २१ होता. तो तामसा येथे आपल्या आजोबाच्या घरी वास्तव्यास होता. तामसा येथील पोलीस पाटील साहेबराव वाघमारे यांच्याकडे राहत होता. वर्गातील पहील्या रांगेत बसणारा एक हुशार विद्यार्थी म्हणुन त्याची शाळेत ओळख होती. वर्गशिक्षका श्री. एल. सी. जोशी यांनी बोलताना म्हणाल्या आहेत की २४ जुलै रोजी जगदीश हा दुपारच्या शिप्टच्या शाळेत आला होता. शाळा काही वेळातच भरणार असल्याने तो खेळत खेळत प्रशाळेच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन जात असताना संरक्षक भिंतीवरील गज त्याच्या पोटात आरपार घुसला.

रक्ताच्या थारोळ्यार्‍यात सापडलेल्या जगदीश अवतार पाहुन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला असता सर्व शिक्षक धावत येऊन त्यांनी जगदीशला गजातून बाहेर काढले आणि तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेवुन गेले. तेव्हा सेवेवर असलेले वैद्यकीय अधिकारी डाॅ. पि. बी. चव्हाण यांनी प्रथमाेपचार सुरु केले असता त्याचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची वृत्त वार्‍यासारखे तामसा शहरात धडकताच विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यु बद्दल शहरात शोककळा पसरली.

घडलेली दुर्दैवी घटना ही प्रशासनाच्या दुर्लक्षाने आणि निष्काळजीपणाने घडली असा मयत यांच्या नातेवाईक यांनी आरोप केला असुन शाळा प्रशासनावर कडक कार्यवाही केल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नसल्याचा विचार घेण्यात आला होता. प्रथम घटनेचे वृत्त कळताच भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुदीराज, हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक रामराव गाडेकर, सायंकाळ पर्यत ठाण्यात ठाण माडुन होते. या ठिकाणी जिल्हा शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षण अधिकारी बंडु आमदुरकर, हदगावचे गटशिक्षण अधिकारी ससाणे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. डी. एल. कदम, नायब तहसिलदार जी. डी. हाराळे, मंडळ अधिकारी संजय बिर्‍हाडे, तलाठी आर. डी. जाधव तामसा पोलीस ठाण्याचे पि. एस. आय. रामराव जगाडे, आदींनी भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी वाठोरे हे होते.

आरोग्यविषयक वृत्त