Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hair beauty tips | बहुतांश महिलांची इच्छा असते की, त्यांचे केस चांगले, लांब, मजबूत आणि सुंदर असावेत. केसांची देखरेख करणे सोपे काम नाही आणि दररोज होणार्‍या छोट्या-मोठ्या चूका केस वेगाने खराब करतात. सौंदर्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला तुमचे केस मोठ्या कालावधीसाठी चांगले ठेवायचे असतील तर ओल्या केसात ही 7 कामे चुकूनही करू नका. (Hair beauty tips)

1. ओल्या केसात ब्रश करणे –
ओले केस खुप कमजोर असतात आणि अशावेळी ब्रश केल्यास ते सहज तुटतात. ते पूर्णपणे सुकल्यावर कंगवा फिरवा.

2. ओल्या केसांवर हिटिंग टूल्सचा वापर करणे –
हिटिंग टूल्स केसांसाठी चांगले मानले जात नाही. ओल्या केसात तर ते आणखी खराब रिझल्ट देतात. केस सुकल्यानंत त्याचा वापर करा.

3. ओले केस बांधणे –
ओले केस बांधणे नुकसानकारक आहे. ओले केस कमजोर असल्याने ते बांधल्यास तुटू लागतात. केस सुकल्यानंतर पोनीटेल करा.

4. ओल्या केसात ब्लो-ड्राय करणे –
ओल्या केसांवर ब्लो ड्राय करणे नुकसानकारक आहे. केस सुकल्यानंतरच ते करा. ड्रायरची सेटिंग मीडियमवर ठेवा.

5. ओले केस हवेत सुकवणे –
ही नैसर्गिक पद्धत नसून यामुळे केस विस्कळीत होऊन फणी फिरवल्यावर केस तुटतात. टॉवलने रगडून, फटके मारून केस सुकवल्याने तुटतात.

6. ओले केस असताना झोपणे –
जास्त ओले असलेले केस घेऊन झोपल्याने स्कॅल्पच्या फोलिसेलचे नुकसान होते. रात्री केस धुतले तर ते पूर्णपणे सुकवून नंतर झोपा.

7. ओल्या केसांवर हेअर स्प्रे लावणे –
जर केसांना स्टाईल करण्यासाठी हेयरस्प्रेचा वापर केला तर ते कोरड्या केसांवर लावल्याने केस सुरक्षित राहतात आणि स्टायलिंग सुद्धा चांगली होते. मात्र ओल्या केसांवर हेयरस्प्रे लावल्याने केसांचा आकार काही वेळानंतर बदलू लागतो. (Hair beauty tips)

Web Title :- Hair beauty tips | wet hair common mistakes damaging locks beauty tips

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Natural Gas | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दणका ! नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ

Return Journey Of Monsoon | पाऊस कधी थांबणार? IMD ने दिली महत्त्वाची माहिती

Crime News | विक्षिप्त Boyfriend ने Girlfriend ला खाण्यास भाग पाडले उंदराचे घरटे, नंतर घडले ‘असे’