BCCI नं भारताची ‘इज्जत’च काढली ! खेळपट्टी सुकवण्यासाठी चक्क ‘हेअर ड्रायर’ अन् ‘इस्त्री’चा केला वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेट सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हे टी-20 सामने 7 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, परंतु सामना सुरु होण्याआधीच पावसाने हजेरी लावली. काही वेळाने पाऊस थांबला परंतु त्यानंतर खेळपट्टी ओलसर असल्याने हा सामना रद्द करण्यात आल्याचे पंचांनी जाहीर केले.

परंतु पावसाने सामना रद्द झाल्यानंतर खेळपट्टीवर जे काही झाले ते हस्यास्पद होते. खेळपट्टी सुकवण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आले त्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआय नावाजले आहे, परंतु असे असताना आता बीसीसीआयची खिल्ली उडवली जात आहे. चाहते म्हणाले की सर्वात श्रीमंत क्रिकेड बोर्डकडे मैदान झाकण्यासाठी चांगले कव्हर नाहीत.

सामना रद्द झाल्याने अनेक माजी क्रिकेटपटू नाराज झाले, व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, इतका कमी पाऊस पडल्यानंतर सामना रद्द होणं हे दुर्देवी आहे. मैदान तयार करणाऱ्यांनी सज्ज असायला पहिजे होते.

ही ग्राउंड स्टाफची चूक असल्याचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने सांगितले.

गुवाहटीतील बारसपारा स्टेडिअममधील हा फक्त तिसरा सामना होता आणि तो देखील रद्द झाला.

भारत – श्रीलंका सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडिअममध्ये गर्दी केली होती परंतु पावसाने सामना रद्द झाल्याने प्रेक्षक नाराज झाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/