Hair Fall | ‘या’ एका गोष्टीच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात गळतात केस, पुरुष-महिलांनी आवश्य ऐकावा डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला दाट, चमकदार, मुलायम केस आवडतात. परंतु आजकालच्या जीवनशैलीत केस गळणे (Hair Fall) ही एक सामान्य समस्या बनली आहे, ज्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही अनेकदा त्रस्त असतात. ज्यांचे केस गळतात (Hair Fall) ते केस गळणे थांबवण्यासाठी शाम्पू, कंडिशनर, थेरपी, मसाज, नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करतात, परंतु तरीही काही लोकांवर कोणताही परिणाम होत नाही (How To Stop Hair Fall).

 

नुकतेच एका डॉक्टरांनी हे उघड केले आहे की केस गळणे (Hair Fall) हे तुमच्या सकाळच्या जीवनशैलीवरही बर्‍याच अंशी अवलंबून असते. खरं तर, लोक सकाळी सर्वात आधी चहा आणि कॉफीच्या कपाने सकाळची सुरुवात करतात (Coffee And Black Tea Can Make Your Hair Fall). समजा सकाळी एक कप कॉफी तुम्हाला एनर्जी देऊ शकते, पण त्यामुळे केसांचे खूप नुकसान होते आणि हेअर फॉल होऊ शकते. चहा आणि कॉफीमध्ये असलेले घटक आयर्नच्या पातळीवर दबाव आणू शकतात, ज्यामुळे केस गळणे वाढते (Tips To Control Hair Loss).

 

डॉक्टर काय म्हणतात (What Doctor Says)
इंग्लंडमधील प्रसिद्ध पोषणतज्ञ आणि डॉक्टर सारा (Dr. Sara) कायत यांच्या मते, एका दिवसात सुमारे 100 ते 150 केस गळणे सामान्य आहे, परंतु ज्या लोकांमध्ये तणावाचे प्रमाण जास्त असते त्यांचे केस गळण्याची शक्यता जास्त असते. पण हेअर फॉल टाळायचे असेल तर तणाव कमी करण्यासोबतच कॅफिनचे (Caffeine) सेवनही कमी करावे लागेल.

डॉ. सारा पुढे म्हणतात, काळा चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे टॅनिन आयर्नचे शोषण रोखू शकते, ज्यामुळे आयर्नची कमतरता आणि केस गळण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही जास्त काळा चहा प्यालात तर त्याचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा काळ्या चहाऐवजी ग्रीन टी पिणे चांगले. कॉफीमध्ये सुमारे 4.6 टक्के टॅनिन असते, तर चहामध्ये सुमारे 11.2 टक्के टॅनिन असते. टॅनिन हे रेणू आहेत जे प्रोटीनला बांधतात आणि झाडांचे लाकूड, साल, कच्ची फळे आणि वनस्पतींच्या पानांमध्ये आढळते (Hair Loss Causes).

 

लॅक्टोज असहिष्णुता असलेल्या लोकांचे गळतात केस (Hair Loss In People With Lactose Intolerance)
केस गळणे केवळ आयर्नची कमतरता असलेल्या लोकांमध्येच नाही तर ज्यांना लॅक्टोजची अ‍ॅलर्जी (Lactose Allergy) आहे अशा लोकांमध्ये देखील आढळते.
अशावेळी लोक दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण कमी करत नाहीत आणि त्यांचे केस गळत राहतात.
म्हणून, ज्यांना लॅक्टोजची अ‍ॅलर्जी आहे अशा लोकांनी नेहमी केस गळती रोखण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करणारी उत्पादने टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Hair Fall | how to stop hair fall and tips to control hair loss diagnosis treatment coffee and black tea can make your hair fall loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mango Harmful Effects | आंबे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा पडू शकता आजारी

 

Side Effects Of Apple Cider Vinegar | वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पित आहात का? जाणून घ्या ‘हे’ साईड इफेक्ट

 

Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि जीरे मिसळून बनवा डिटॉक्स वॉटर, जाणून घ्या बनवण्याची पद्धत