Mango Harmful Effects | आंबे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा पडू शकता आजारी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mango Harmful Effects | उन्हाळी हंगामाच्या आगमनाबरोबरच फळांचा राजा आंबा (Mango) बाजारात सर्वत्र दिसू लागतो. आंबा बहुतेकांना खूप आवडतो. पुरी, रोटी किंवा पराठेही अनेक ठिकाणी आंब्यासोबत खाल्ले जातात (Health Tips). तुम्हीही आंब्याचे मोठे चाहते असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे (Mango Harmful Effects). उदाहरणार्थ, आंबा खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टींचे सेवन करणे टाळा, जेणेकरून आरोग्याला हानी पोहोचणार नाही आणि संपूर्ण हंगामात तुम्हाला आंब्याचा आनंद घेता येईल (Never Eat These 5 Things Immediately After Eating Mangoes).

 

आंबा खाल्ल्यानंतर काही गोष्टी टाळल्या नाहीत तर त्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात (Mango Harmful Effects)…

 

1. आंब्यानंतर कोल्ड्रिंक पिऊ नका (Don’t Drink Cold Drinks After Mango)
कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेले सोडा आणि साखर दोन्ही शरीरासाठी हानिकारक असतात. आंब्यामध्येही नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण (Sugar Level) जास्त असते आणि त्यानंतर कोल्ड्रिंक प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढण्याचा धोका असतो.

 

2. दही खाऊ नका (Don’t Eat Curd)
आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही सेवन करणे देखील योग्य नाही. कारण आंबा आणि दही मिळून कार्बन डायऑक्साइड तयार होतो, ज्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.

3. पाणी (Water)
काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य मानले जात नाही. खाल्ल्यानंतर तहान नक्कीच लागते, पण काही वेळ थांबून पाणी पिणे चांगले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटाला ते पचण्यास त्रास होतो. त्यामुळे गॅस, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

 

4. मसालेदार अन्नापासून दूर राहा (Stay Away From Spicy Foods)
साधारणपणे उन्हाळ्यात जेवल्यानंतर लोकांना आंबा खायला आवडतो. मात्र, ही सवय योग्य नाही.
मसालेदार जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोटदुखी किंवा छातीत जळजळ होऊ शकते.
यासोबतच मुरुमांसारख्या समस्याही सुरू होऊ शकतात.

 

5. कारले (Bitter Gourd)
जेवताना जर तुमच्या ताटात कारले आणि आंबा दोन्ही असतील तर थांबा. कारण कारले आणि आंबा एकत्र खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खाल्ल्याने उलट्या, मळमळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Mango Harmful Effects | never eat these 5 things immediately after eating mangoes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diet Mistakes | डाएटमध्ये ‘या’ 10 मोठ्या चूका करताहेत लोक, जाणून घ्या शरीरासाठी किती घातक

 

Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी व ते आकर्षित दिसण्यासाठी करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय; जाणून घ्या

 

Bael Juice Benefit In Summer | उन्हाळ्यात रोज प्या 1 ग्लास बेल ज्यूस, होतील आश्चर्यकारक फायदे