Side Effects Of Apple Cider Vinegar | वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पित आहात का? जाणून घ्या ‘हे’ साईड इफेक्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Side Effects Of Apple Cider Vinegar | अनेकदा गरम पाण्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर ( Apple Cider Vinegar) पिण्याची शिफारस केली जाते. ते प्यायल्याने वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत होते आणि मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे, ते पिऊन तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. परंतु, याचे अनेक तोटे सुद्धा आहेत (Side Effects Of Apple Cider Vinegar). अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पिण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या (Know These Side Effects Before Drinking Apple Cider Vinegar).

 

1) पचन बिघडते (Spoils Digestion)
स्वीडनमधील माल्मो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या ल्युंड युनिव्हर्सिटीत केलेल्या अभ्यासात पोट रिकामे होण्यास उशीर होण्याला जबाबदार अ‍ॅपल सायडर व्हिनेगर असल्याचे म्हटले आहे, तर इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ते पिण्यामुळे मळमळ होते, ज्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते. अशावेळी ते तुमची पचनसंस्था बिघडू शकते.

 

2) अ‍ॅसिडिटीची समस्या (Acidity Problem)
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पीत असाल तर यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते. मेडस्केप जनरल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित 2006 च्या अहवालानुसार, यीस्टमध्ये मिसळलेले सफरचंद त्यांच्यातील शुगरचे अल्कोहोलमध्ये रूपांतर करतात.

 

त्यानंतर अल्कोहोल बॅक्टेरिया अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडमध्ये मिसळतात आणि अशा प्रकारे सफरचंद सायडर व्हिनेगर बनते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर जास्त प्रमाणात प्यायल्यास पोटात जळजळ आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

3) हाडांचे नुकसान (Bone Loss)
ऑस्ट्रियातील इन्सब्रक विद्यापीठाच्या अंतर्गत औषध विभागाच्या अहवालानुसार, अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे दीर्घकाळ सेवन केल्याने हाडांचे आरोग्य खराब होते.
कारण आम्ल हाडांमधून पोटॅशियमसारखे खनिजे काढून टाकते.

 

4) इतर औषधे घेत असाल तर होऊ शकतो त्रास (Other Medications Can Cause Discomfort)
तुम्ही जुलाब, लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध किंवा इन्सुलिन घेत असल्यास,
आम्लयुक्त सफरचंद सायडर व्हिनेगर या औषधांवर सहज प्रतिक्रिया देऊ शकते आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते.
ज्यांना मधुमेह आहे किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी ते टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच प्यावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Of Apple Cider Vinegar | know these side effects before drinking apple cider vinegar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diet Mistakes | डाएटमध्ये ‘या’ 10 मोठ्या चूका करताहेत लोक, जाणून घ्या शरीरासाठी किती घातक

 

Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी व ते आकर्षित दिसण्यासाठी करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय; जाणून घ्या

 

Bael Juice Benefit In Summer | उन्हाळ्यात रोज प्या 1 ग्लास बेल ज्यूस, होतील आश्चर्यकारक फायदे