ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार, अमेरिकेच्या मिडियाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १० लाख डॉलरचे बक्षीस असलेल्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा याचा खात्मा केल्याचा दावा अमेरिकन मिडियाने केला आहे. या संबंधीचे वृत्त एनबीसी न्यूजने दिले आहे.
दहशतवादी कृत्य करणाऱ्या हमजा बिन लादेनचा खात्मा केला असल्याचा एका अमेरिकन अधिकाऱ्यांच्या दाव्याचा हवाला देऊन हे वृत्त देण्यात आले आहे. मात्र, हमजा याला कधी आणि कुठे मारले याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत एनबीसीने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात नकार दिला. त्यांनी हमजा ठार झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला नाही किंवा होकारही दिला नाही़.

हमजा हा ओसामा बिन लादेन यांचा १५ वा मुलगा आहे. अमेरिकेने २०१७ जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हमजा लादेन यांचे नाव होते. हमजा याला आपल्या वडिलांच्या ओसामा बिन लादेन यांच्या मृत्युचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी तो अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हमजा याची माहिती देणाऱ्याला १० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.

पाकिस्तानमधील वजिराबाद येथे लपून बसलेल्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सील कंमाडोंनी मे २०११ मध्ये कारवाई करुन त्याला ठार केले होते. त्यानंतर हमजा याने आपल्या वडिलांच्या मृत्युचा बदला घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –