#वाघाबाॅर्डरवर ‘जोश ही जोश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकच्या ताब्यात असणारे भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे वाघा बार्डरमार्गे भारतात परतणार आहेत. काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता करण्याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे आज विंग कमांडर अभिनंदन आपल्या मायदेशी भारतात परततील. याच पार्श्वभूमीवर कालपासून सोशल मीडियावर चलो वाघा बाॅर्डर असे मेसेज फिरत आहेत. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी देशभक्त मोठ्या प्रमाणात अमृतसरमध्ये दाखल झाले आहेत.

कसे पकडले गेले अभिनंदन ?
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या कारवाईनंतर बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आली. यावेळी भारतीय हवाई दलाने याचे चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी भारतातील 3 विमानांपैकी एक विमान मिग 21 हे पाकिस्तानने पाडले. त्यामुळे यात असणारे भारतीय विंग कमांडर हे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. यावेळी भारतीय विंग कमांडरला पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले होते.
अभिनंदन यांना भारतात पाठवण्याची घोषणा
अभिनंदन यांचे व्हिडीओ, फोटो पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले. भारताने जिनिव्हा करारानुसार भारतीय कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारतात सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार अभिनंदन यांना भारतात पाठवण्याची घोषणा गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. अखेर आज अभिनंदन यांना भारतात परत पाठवण्यात येणार आहे.