Happy Birthday Salman Khan | वाढदिवसानिमित्त रितेशने सलमान खानसाठी लिहिली ‘हि’ खास पोस्ट; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमध्ये भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान (Happy Birthday Salman Khan) आज आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री त्याने त्याचे नातेवाईक आणि जवळची मित्र मंडळी यांच्याबरोबर मिळून त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या निमित्ताने मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने सलमान खानला (Happy Birthday Salman Khan) खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

 

Advt.

रितेशने सलमानबरोबरचा फोटो शेअर करत “तुम्हाला न विचारता तुमच्यासाठी कायम उभा राहणारा, मदत करणारा असा माणूस तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही धन्य झालात. सलमान खान ही ती व्यक्ती आहे जी माझ्या आयुष्यात आहे. माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुला उत्तम आरोग्य आणि भरपूर आयुष्य मिळो, वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Salman Khan) भाऊ….” खुप खूप शुभेच्छा असे कॅप्शन दिले आहे.

 

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटामध्ये सलमानची झलक बघायला मिळणार आहे.
रितेश आणि सलमानचे या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
याअगोदर हि जोडी ‘लई भारी’ चित्रपटात एकत्र दिसली होती.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title :- Happy Birthday Salman Khan| bollywood star salman khan celebrating his 57 birthday riteish deshmukh wishing him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raja Bapat Passed Away | ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Cyber Crime | मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला सायबर चोरट्याने घातला 5 लाखांना गंडा

Lalit Prabhakar | अभिनेता ललित प्रभाकरचा आगामी चित्रपट ‘टर्री’चा पोस्ट आउट; लिलतच्या रांगड्या लुकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष