Happy Hormones Foods | कुटुंबात ठेवायचे असेल आनंदाचे वातावरण? डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ 5 फूड्स, हॅप्पी हार्मोन्स होतील बूस्ट

नवी दिल्ली : Happy Hormones Foods | राग येण्यापासून आनंदी राहण्यापर्यंत शरीरावर हार्मोन्सचा खूप प्रभाव असतो. शरीरात असे काही हार्मोन्स देखील असतात जे रक्तप्रवाहाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूला आराम वाटतो. यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. यामध्ये सेरोटोनिन, एंडोर्फिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन इत्यादि सारखे हार्मोन्स आहेत. कोणत्या गोष्टी खाल्ल्याने हॅपी हार्मोन्स शरीरात सक्रिय होतात ते जाणून घेऊया. (Happy Hormones Foods)

१. डार्क चॉकलेट :

‘टीओआय’मध्ये प्रकाशित बातमीनुसार, डार्क चॉकलेट हे आनंदी हार्मोन्सचा चांगला स्रोत आहे. ते खाल्ल्याने मूड चांगला राहतो. त्यात मिनरल्स आणि मॅग्नेशियम देखील असते. यामुळे तणाव कमी होतो. चिंता कमी होते. (Happy Hormones Foods)

२. ब्लू बेरी :

ब्लू बेरीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराला हानिकारक बॅक्टेरियापासून वाचवतात. हे तणाव कमी करून मन शांत आणि आनंदी करते. (Happy Hormones Foods)

३. एवोकॅडो :

एवोकॅडो हे व्हिटॅमिन बी ६ चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे खाल्ल्याने मूड सुधारतो. हे शरीरातील हॅप्पी हार्मोन्स सक्रिय करते. याचे आरोग्यासाठी इतर अनेक फायदे होतात.

४. हिरव्या पालेभाज्या :

हिरव्या पालेभाज्या अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यांच्या सेवनाने शरीरात हॅपी हार्मोन्स सक्रिय होतात. केल आणि पालक या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम मुबलक आढळते. जे तणाव कमी करून हॅप्पी हार्मोन्स सक्रिय करते.

५. नट्स :

काजू, बदाम, अंजीर, अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रूट्सच्या सेवनाने हॅपी हार्मोन सक्रिय होतात. जे तणाव कमी करून मूड ठीक करतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

GST On PG Hostel Rent | हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांसाठी वाईट बातमी!
आता भाड्यावर भरावा लागेल 12 टक्के जीएसटी

Spices Price Hike | भाज्यांनंतर मसाले बिघडवणार चव! डबल डिजिटमध्ये वाढत आहेत किंमती,
जिऱ्याने मोडला विक्रम

Pune Mahavitaran News | लाईट बिल कॅशमध्ये भरण्यावर 1 ऑगस्टपासून कमाल मर्यादा;
ऑनलाइन वीज बिल भरण्याचे महावितरणकडून आवाहन