Happy New Year | 2022 सुुरू होण्यापूर्वी आवश्य करा ‘ही’ 7 कामे, संपूर्ण वर्षभर लक्ष्मीमाता करेल धनवर्षाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Happy New Year | नवीन वर्ष 2022 (New Year 2022) जीवनात सुखसमृद्धी घेऊन यावे असे सर्वांना वाटते, आगामी काळात पैशाची कमतरता भासू नये. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय सुद्धा करतात. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात. (Happy New Year)

 

ही कामे करा

 

 

1- घराची स्वच्छता :
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. विशेषत: मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा आणि स्वस्तिक चिन्ह काढा.

 

 

2- गणेश मंदिराला भेट द्या :
नवीन वर्षाच्या अगोदर, पूजा घराची स्वच्छता देखील केली पाहिजे आणि तुटलेल्या मूर्ती काढून टाका. वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती मंदिराला भेट द्या. गणपतीला लाडूचा प्रसाद अर्पण केल्यानंतर प्रसादाचे वाटप गरिबांना करा. (Happy New Year)

 

3- पूजेची सुपारी ठेवावी :
पूजेची सुपारी हे गौरी-गणेशाचे रूप मानले जाते. तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी ती ठेवल्याने धनवृद्धी होते. यामुळे तिजोरीत गणेश आणि लक्ष्मीचा वास राहतो. नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी हे काम करा.

 

4- तुळस किंवा मनीप्लांट :
नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे इनडोअर प्लांट लावणे शुभ असते. तुळशी किंवा मनीप्लांट आणू शकता.

 

5- लाफिंग बुद्धा :
नवीन वर्षाच्या शुभप्रसंगी तुम्ही लाफिंग बुद्धा घरी आणू शकता. ते नेहमी उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. घरात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

 

6- घराच्या उत्तर दिशेला कोणतीही अनावश्यक वस्तू ठेवू नका. वर्षाच्या पहिल्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला कलश आणि नारळ ठेवा.

 

7- पर्स-तिजोरी रिकामी ठेवू नका :
वर्षाच्या पहिल्या दिवसापासून काही पैसे पर्स, पाकीट किंवा तिजोरीत ठेवा. पर्स किंवा तिजोरी रिकामी ठेवणे अशुभ मानले जाते. अत्तर किंवा झाडू कधीही तिजोरीजवळ किंवा कपाटाजवळ ठेवू नये.

 

 

Web Title :- Happy New Year | new year vastu tips for money prepration for new year according to vastu shastra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Lockdown | ‘राज्यात लॉकडाऊनची स्थिती येतेय, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार’ – विजय वडेट्टीवार

 

Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

 

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन डी’च्या मोठ्या कमतरतेचे संकेत आहेत ‘ही’ 5 लक्षणे, बहुतांश लोक करतात दुर्लक्ष

 

Pune Crime | हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण, पुण्याच्या कोथरूड परिसरातील हॉटेल स्पाईस गार्डनमधील घटना