Pune Crime | हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण, पुण्याच्या कोथरूड परिसरातील हॉटेल स्पाईस गार्डनमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या वडिलांना व त्यांच्या मित्रांना हॉटेल मॅनेजर व इतर कामगारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुडमध्ये (Kothrud News) राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या पालकाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली (Pune Crime) आहे.

त्यानुसार पोलिसांनी हॉटेल स्पाईस गार्डनचे (Spice Garden, Kothrud) मॅनेजर विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर हॉटेलमधील १३ ते १५ कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार किष्किंदानगर (kishkinda nagar kothrud) येथील हॉटेल स्पाईस गार्डनमध्ये २५ डिसेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल स्पाईस गार्डन येथे गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर व सर्व पाहुणे गेल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत जेवण करीत होते. त्यावेळी हॉटेलचा मॅनेजर विनय शेट्टी तेथे आला व त्याने फिर्यादीकडे बघून खूप उशीर झाला, यांचे जेवण कधी होणार, पैसे देणार की नाही, असे फिर्यादी यांना टोमणे मारले. फिर्यादी यांचे जेवण झाल्यावर त्यांनी गुगल-पेद्वारे (Google Pay) पैसे ट्रान्सफर केले.

परंतु पैसे ट्रान्सफर न झाल्याने विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर कामगारांनी फिर्यादी यांना फुकटे आहेत, असे म्हणून त्यांना व त्यांच्या दोघा मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) करुन हॉटेलमधून बाहेर हाकलून दिले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड (PSI Rathod) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Hotel manager and 15 others beat up customers,
incident at Hotel Spice Garden in Kothrud area of ​​Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख