Hardik Pandya | काय सांगता ! होय,, हार्दिक पांड्याने IPL चं केलं लाखोंचं नुकसान, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hardik Pandya | आयपीएलच्या (IPL 2022) हंगामाला सुरूवात झाली असून आत्तापर्यंत प्रत्येक संघाचे 4 पेक्षा जास्त सामने झाले आहेत. अशातच स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) इंडियन प्रीमियर लीगचं (IPL) मोठं नुकसान केलं आहे. राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यावेळी हार्दिक पांड्याने केलेल्या थ्रोमुळे आयपीएलला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

 

राजस्थान रॉयल्सचा संघ फलंदाजी करत असताना कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) चेंडू प्लेड करत एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्षेत्ररक्षक होता, त्याने चेंडूने बथेट स्टंप (Stump) उडवले. मात्र त्याचा थ्रो इतका जबरदस्त होता की स्टंप तुटला. या स्टंपची किंमत जवळपास 35 ते 40 लाख इतकी असते.

 

लाईटचे स्टंप का वापरतात ?
या स्टंपमुळे खूप फायदा होतो, बेल्समधील मायक्रोप्रोसेसरला हालचालींची जाणीव होते. त्यामुळे चेंडू हलकासा जरी स्टंप लागला तरी लगेच लाईट (Light) लागतात. विशेष म्हणजे या स्टंपला मोठ्या दर्जाच्या बॅटरीही असतात. टी – 20 वर्ल्डकपमध्येही (T20 World Cup) याच स्टंपचा वापर करण्यात आला होता.

 

दरम्यान, हार्दिक पांड्याने केलेल्या थ्रोचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
यावर अनेक मिम्सही बनताना दिसत आहेत.

 

Web Title :- Hardik Pandya | hardik pandya loss of ipl through rocket throw

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा