‘अश्लील’ चॅटिंगमध्ये अडकले पाकिस्तानचे रेल्वे मंत्री, ‘तिच्या’सोबतचा व्हिडीओ कॉल ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची सोशल मीडिया स्टार हरीम शाह ने गुरुवारी रेल्वेमंत्री शेख रशीद यांच्यासोबतची व्हिडिओ कॉलचे एक फुटेज शेअर केले. हरीम हिने पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांच्यावर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप केला आहे. शेख रशीद हे अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानाने आणि भारताला युद्धाची धमकी देण्यासंदर्भात चर्चेत असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये टिक टॉक स्टार हरीम, रेल्वेमंत्री शेख रशीद यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधताना दिसत आहे.

ती म्हणते, मी आतापर्यंत तुमचे कुठलेही रहस्य उघड केले नाही, तरीही तुम्ही माझ्याशी बोलत का नाही.

उत्तर देताना रशीद म्हणतात, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. त्यानंतर रेल्वेमंत्री शेख रशीदला रहीम म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं आहे .. तुम्ही माझ्याकडे पाठवलेल्या त्या न्यूड व्हिडिओंचं काय, त्या सगळ्यांना तुम्ही विसरलास का?

हरीम जेव्हा शेख रशीद यांना असे बोलते तेव्हा मधेच कॉल डिस्कनेक्ट होतो. तथापि, या व्हिडिओची पुष्टी झालेली नाही.

नंतर हरीम शहाने हे ट्विट हटवून आपल्या अकाऊंटवरून व्हिडिओ संदेश पोस्ट केला आणि म्हटलं की कोणालाही बदनाम करण्याचा आपला हेतू नाही. हरीम म्हणाली, जे लोक माझ्यामागे आहेत, त्यांनी कृपया हे बंद करावे, माझ्याकडे करण्यासारख्या बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत.

पाकिस्तानमध्ये #Hareemshah हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. पाकिस्तानमधील सोशल मीडियावर या प्रकरणावरून वादविवाद देखील झाला.

काही वापरकर्ते म्हणाले की मंत्री जर महिला राहिली असती तर या घटनेस वेगळ्या दृष्टीने बघितले गेले असते. यापूर्वी हरिम शाहचा रेल्वेमंत्री शेख रशीदसोबतचा एक सेल्फी खूप व्हायरल देखील झाला होता.

टिकटॉक स्टार हरीम शाहने पाकिस्तानमधील सर्व बड्या राजकारण्यांसोबत टिकटॉक व्हिडिओ बनवले आहेत. तिने पंतप्रधान कार्यालयात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीवर बसून देखील एक सेल्फी घेतली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/